Headlines

1 लाख 5 हजार ग्राहकांकडे स्मार्ट मीटर:शिवसेनेच्या शिंदे गटाचा एल्गार, ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया थांबवा‎



जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे १ लाख ५ हजार घरगुती ग्राहकांकडे स्मार्ट मीटर लावण्यात आले आहेत. मात्र, स्मार्ट वीज मीटर बसवण्यासाठी महावितरण कंपनीकडून ग्राहकांना पाठवण्यात येत असलेल्या मेसेजचे सोमवारी तीव्र पडसाद उमटले. ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्टमीटर

.

महावितरण कंपनीकडून ग्राहकांना ‘४८ तास’ मुदतीत स्मार्ट मीटर लावून घेण्याबाबत मेसेज येत आहेत. ‘भारत सरकारने १७ ऑगस्ट २०२१ रोजी जारी केलेल्या राजपत्र अधिसूचनेनुसार, हा संदेश मिळाल्यापासून ४८ तासांनंतर तुमचे सध्याचे मीटर बदलून स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहे, असे नमूद केले आहे. उर्वरित पान ४ जिल्ह्यात सुमारे ४ लाख ५० हजार घरगुती वीज ग्राहक आहेत. जिल्ह्यात काही दिवसांपासून ग्राहकांचे जुने मीटर बदलवून स्मार्ट (टाईम ऑफ द डे- टीओडी) मीटर लावण्यात येत आहे. आहे. जिल्ह्यातील जुन्या ८५ हजार ९५६ ग्राहकांकडे मीटर लावण्यात आले आहे. तसेच नवी वीज जोडणीसाठी १९ हजार ३१३ ग्राहकांकडे मीटर बसवण्यात आले आहेत. हे मीटर केवळ वापरलेल्या विजेचे अचूक मोजमाप करते, असे महावितरण कंपनीकडून दावा करण्यात आले आहे. या मीटरसाठी महावितरण कोणत्याही प्रकारचे शुल्क ग्राहकांकडून आकारत नाही, शिवाय हे मीटर बसवणे सर्वच ग्राहकांसाठी अनिवार्य असल्याचेही महावितरणने स्पष्ट केले आहे. केंद्र, राज्य व महापालिकेच्या सत्तेतही सहभागी झालेल्या शिंंदेच्या शिवसेनेकडून सरकारच्या निर्णयाविरोधात अकोल्यात आंदोलन करण्यात येत आहे. असे आंदोलन करण्याची ही पहिली वेळ नाही. सरकारी यंत्रणाविरोद्धच्या आंदोलनात भाजप त्या-त्या प्रशासनाची बाजू घेते. मात्र शिंदे गट मित्र पक्ष भाजपला कोंडीत पकडण्याची संधी सोडत नसल्याचे दिसून आले. मुळात शिंदे गटातील सध्याचे प्रमुख पदाधिकारी हे कधी काळी शिवसेनेच्या ठाकरे गटात व भाजपवासी होते. मात्र काही दिवसांपूर्वी ते शिंदे गटात आले.

मित्र पक्ष शिवसेनेकडून भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न

मीटर लावणे अनिवार्य; महावितरणचा दावा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *