Headlines

Khandesh-Sambhajinagar Six-Lane Highway Survey Ready; 1600 Hectares Land Acquired



खान्देश आणि मराठवाड्याला जोडणाऱ्या पहिल्या ‘ग्रीनफील्ड’ सहापदरी महामार्गाचा सर्वेक्षण अहवाल तयार झाला आहे. धरणगाव तालुक्यातील पाळधी येथून सुरू होणारा हा महामार्ग छत्रपती संभाजीनगरजवळील चौका गावाजवळून ‘सावंगी इंटरचेंज’द्वारे थेट समृद्धी महामार्गाला जो

.

या 105 किमी लांबीच्या महामार्गामुळे जळगाव ते संभाजीनगरचे अंतर 50 किमीने कमी होणार असून, साडेतीन तासांचा प्रवास 120 किमी प्रतितास वेगाने अवघ्या एका तासावर येणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी दोन्ही जिल्ह्यांतील 8 तालुक्यांमधील 61 गावांच्या शिवारातून सुमारे 1600 ते 1700 हेक्टर जमीन संपादित केली जाईल. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील 670 हेक्टर तर संभाजीनगर जिल्ह्यातील 950 हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. या मार्गावर पाचोरासह दोन ठिकाणी इंटरचेंज, दोन नद्यांवर पूल आणि एका रेल्वे लाईनवर उड्डाणपुलाची उभारणी केली जाणार आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लवकरच अधिकृत अधिसूचना जारी केली जाईल. छत्रपती संभाजीनगर जिल्हा (4 तालुके – सोयगाव, सिल्लोड, कन्नड, फुलंब्री): घोसला, नांदगांव, घाटनांद्रा, लोहगाव, रायगाव, वाकद, शेलगाव (जहांगरी), दहीगाव, आडगाव (पिशोर), नाचनवेल, कोपरवेल, सारोळा, डोंगरगाव, कान्हेगाव, चिचोली नकीब, सोनारी खु., वावणा, निधोणा, वाहेगाव, डोंगरगाव शिव, पिंपळगाव वळण, वाणेगाव खु., वारेगाव, किनगाव, गणोरी, मुर्शिदाबाद वाडी आणि चौका.

या शिवारातून जाणार महामार्ग

जळगाव जिल्हा (5 तालुके – धरणगाव, एरंडोल, जळगाव, पाचोरा): टहाकळी, पाळधी बु., पाळधी खु., सावडे प्र.चा., पिंपळकोठे प्र.चा., खेडी खु., रवंजे खु., रवंजे बु., दापोरी, लमांजन, कुऱ्हाडदे, वाकडी, म्हसावद, बोरनार, डोमगांव, पाथरी, सामनेर, लासगांव, आसनखेडे खु., नांद्रा, पहान, मोहाडी, नाईकनगर, सांगवी प्र. लोहारे, साजगाव, लोहारी बु., वरखेडी बु., लासुरे, वाणेगाव, राजुरी बु., वाडी, शिंदाड व गहुले.

  • धुळे – जळगाव महामार्गावरील पाळधीपासून तयार होणार नवा ‘ग्रीनफील्ड’ महामार्ग.
  • जळगाव- संभाजीनगरमधील 8 तालुक्यातून जाणारा महामार्ग असेल 105 किमी लांबीचा.

व्यापार-उद्योगाची ‘लाइफलाइन’…

हा गुजरात आणि मध्य प्रदेशातून थेट पुणे, मुंबई किंवा दक्षिण भारताकडे जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी हा मार्ग ‘लाइफलाइन’ ठरणार आहे. यामुळे इंधन आणि वेळेची मोठी बचत होईल, तसेच जळगाव जिल्ह्यातील केळी आणि मसाले यांसारखी कृषी उत्पादने अवघ्या काही तासांत मोठ्या बाजारपेठांमध्ये पोहोचवणे शक्य आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *