Headlines

संभाजीनगरात तिरंगी लढत:विधान परिषदेच्या 11 जागांसाठी उद्या मतदान; 31 उमेदवार, 7043 मतदार, ईव्हीएम नव्हे, मतपत्रिकेचा वापर




स्थानिक स्वराज्य संस्थांतून विधान परिषदेवर निवडल्या जाणाऱ्या आमदारांसाठी गुरुवार, १८ जून रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ पर्यंत मतदान होत आहे. २२ जून रोजी मतमोजणी होणार आहे. एकूण १७ जागांसाठी ही निवडणूक होणार होती. मात्र, त्यातील अहिल्यानगर, ठाणे, यवतमाळ, पुणे, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या ६ जागा बिनविरोध झाल्या. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जळगाव, भंडारा-गोंदिया, धाराशिव-लातूर-बीड, सोलापूर, परभणी-हिंगोली, नांदेड, सांगली-सातारा, अमरावती, नागपूर येथे ३१ उमेदवारांत सामना होणार आहे. सोलापूर, नागपूर, धाराशिव-लातूर-बीड वगळता अन्य ठिकाणी तिरंगी तर जळगावात चौरंगी लढत होत आहे. मात्र, प्रामुख्याने महायुतीविरुद्ध मविआमध्ये चुरस आहे. या निवडणुकीत संबंधित मतदारसंघातील महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदेतील नगरसेवक आणि जिल्हा परिषदेचे सदस्य असे एकूण ७०४३ मतदार आहेत.

नाशिक, जळगाव येथे महायुतीची परीक्षा सूत्रांनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंसह महायुतीचे स‌र्वाधिक लक्ष नाशिक, जळगाववर आहे. कारण नाशिकमध्ये भाजप बंडखोर गणेश गितेंनी आपला प्रचार थांबवला. तरीही शिंदेसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडेंविरुद्ध खदखद कायम आहे. येथे दराडेंविरुद्ध मविआ-शरद पवार गटाचे गोरख बोडकेंमध्ये मुख्य लढत रंगणार आहे. जळगावमध्ये सर्वाधिक ४ उमेदवार रिंगणात आहेत. छत्रपती संभाजीनगरात भाजपचे सुहास शिरसाट विरुद्ध उद्धवसेनेचे गणेश लोखंडे, एमआयएम पुरस्कृत इसाकखान सांडूखान अशी तिरंगी लढत होईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *