Headlines

भावलीत 19 तर तळेगाव धरणात अवघा 9 टक्के पाणीसाठा शिल्लक:इगतपुरीत पाणीटंचाईचे सावट, शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू‎



शहराला पाणीपुरवठा करणारे भावली धरण, बारा बंगला येथील नगरपरिषदेचा तलाव तसेच जीवन प्राधिकरण विभागाचा तळेगाव तलाव यांनी तळ गाठल्याने शहरावर पाणीटंचाईचे संकट गडद होऊ लागले आहे. सध्या शहरासाठी महत्त्वाच्या असलेल्या भावली धरणात केवळ १९ टक्के , तळेगाव धरणात

.

यंदा उष्णतेची तीव्रता वाढल्याने आणि बाष्पीभवनाचे प्रमाण जास्त राहिल्याने जलसाठ्यांतील पाण्याची पातळी झपाट्याने कमी झाली आहे. त्यातच एल-निनोच्या प्रभावामुळे मान्सूनचे आगमन लांबण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर भविष्यातील संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने व नियोजनबद्ध वापर करण्याचे आवाहन इगतपुरी नगरपरिषदेने केले आहे. २५ हजार लोकसंख्येला सध्या नगरपरिषदेमार्फत शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत असून, उपलब्ध साठा लक्षात घेऊन पाणीपुरवठ्याची वेळ कमी केली आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार यावर्षी एल-निनोच्या प्रभावामुळे पाऊस उशिरा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा साठा जपून वापरणे अत्यंत आवश्यक आहे. घरगुती वापरानंतरचे शिल्लक पाणी विनाकारण फेकू नये, नळ सुरू ठेवून पाणी वाया घालवू नये. वाहन धुणे, अंगण धुणे तसेच इतर अनावश्यक कामांसाठी पाण्याचा वापर टाळावा. प्रत्येक नागरिकाने पाणी बचतीसाठी सहकार्य करावे. – किशोर चव्हाण , मुख्याधिकारी, इगतपुरी नगरपरिषद



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *