![]()
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात सतत मुसळधार पाऊस पडत असून डोंगर उतारावरील माती सैल झाल्यामुळे दरड कोसळण्याची, रस्ते खचण्याची तसेच नाले व ओढ्यांना पूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाबळेश्वर व पाटण तालुक्यातील काही रस्ते वाहतुकीस धोकादायक ठरत असून, नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या संरक्षणासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने खालील रस्ते वाहतुकीस धोकादायक ठरत असलेने सुरक्षिततेच्या कारणास्तव सदरचे रस्ते पुढील आदेशापर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी तात्पुरते बंद करण्यात येत आहेत. सातारा कास बामणोली तापोळा महाबळेश्वर रस्ता ता. महाबळेश्वर रस्ता खचल्याने वाहतुकीसाठी तात्पूर्ता बंद करण्यात आला असून हलक्या वाहनांची वाहतूक सुरू राहणार आहे. या मार्गावरील वाहतुक मांगर पारूट ते झोळाची खिंड रस्ता ता. महाबळेश्वर मार्गे वाळवण्यात आली आहे. तर पाटण तालुक्यातील डिचोली नवजा हेळवाक रस्ता राज्य मार्ग क्र. 148 हा रस्ता खचल्यामुळे या मार्गावरील वाहतूक कोयना नेहरू उद्यान ते कामरगांव ता. पाटण या मार्गाने वळविण्यात आली आहे. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आज याबाबत आदेश जारी केले आहेत. पुढील आदेश होईपर्यंत या मार्गावरील वाहतुक बंद राहणार असल्याचेही आदेशात म्हंटले आहे.
Source link
साताऱ्यात पावसाचा जोर:महाबळेश्वर आणि पाटणमधील धोकादायक रस्ते वाहतुकीसाठी बंद