![]()
जागतिक वारसा स्थळ असलेल्या वेरूळ लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर लेणी क्रमांक २९ वरील नैसर्गिक धबधबा पुन्हा जोरदारपणे प्रवाहित झाला आहे. परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे धबधबा सुरू झाल्याने लेणींचे सौंदर्य अधिकच खुलले आहे. पावसाने उजळले लेणींचे सौंदर्य पावसाळ्यात डोंगररांगांमधून साचलेले पाणी लेणी क्रमांक 29 वरील जोगेश्वरी समोरील असलेले कुंडातून पाणी भरून व कुंडच्या वरून पाणी प्रवाहने वाहू लागते व त्यामुळे हा धबधबा कोसळते आणि त्यामुळे दगडी कलाकृतींना पाण्याची नजाकत मिळते. कैलास मंदिरासोबतच हा धबधबा पर्यटकांचे खास आकर्षण ठरतो. धबधबा सुरू होताच परिसरातील वातावरण आल्हाददायक झाले असून येत्या शनिवार-रविवारी पर्यटकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
Source link
वेरूळ लेणीच्या सौंदर्यात भर:सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर लेणी क्र. 29 वरील धबधबा प्रवाहित; VIDEO