Headlines

येत्या 2वर्षांत पैठणचे संत ज्ञानेश्वर उद्यान होणार पर्यटनाचे जागतिक केंद्र:विकासकामांचा आमदार विलास भुमरे यांच्याकडून आढावा‎




ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेल्या पैठण नगरीच्या वैभवात आता आणखी भर पडणार असून, येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाचा जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र म्हणून विकास केला जाणार आहे. दोन वर्षांत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन असून, त्यासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही आमदार विलास भुमरे यांनी दिली. संत ज्ञानेश्वर उद्यानात आयोजित विकासकामांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीनंतर आमदार भुमरे यांनी अधिकाऱ्यांसह संपूर्ण उद्यान परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून आगामी कामांचा वेध घेतला. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळामार्फत जायकवाडी धरण व उद्यान परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर भव्य प्रकल्प राबविण्यात येत आहे. संत ज्ञानेश्वर उद्यान, अॅडव्हेंचर पार्क आणि धरणाच्या डाउनस्ट्रीम भागातील सुमारे २३२ हेक्टर क्षेत्रात हा प्रकल्प साकारणार आहे. यासाठी जागतिक दर्जाचे अनुभवी विकासक, नामांकित हॉटेल-रिसॉर्ट कंपन्या आणि गुंतवणूकदारांकडून ‘एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट’ मागविण्यात आले असून, या प्रक्रियेचा वेग वाढवण्याच्या सूचना आमदारांनी दिल्या. बैठकीला कार्यकारी अभियंता गणेश हुसे, दीपक डोंगरे, तुषार विसपुते, मंगेश शेलार यांच्यासह उद्यान विकास समितीचे प्रा. संतोष गव्हाणे, पवन लोहिया, शेखर शिंदे, जालिंदर आडसुळ, सतिष अंधाळे, नामदेव खरात, अनिकेत धारकर आदी उपस्थित होते. स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला गती ‘या भव्य प्रकल्पामुळे पैठणच्या धार्मिक आणि ऐतिहासिक पर्यटनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, यामुळे स्थानिक पर्यटनावर आधारित अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळून पैठणी उद्योग आणि हस्तकला व्यवसायाची भरभराट होईल,’ असा विश्वास आमदार भुमरे यांनी व्यक्त केला. या प्रकल्पामध्ये स्थानिक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *