Headlines

प्रकरणातील सर्व 8 आरोपींना 24 तासांत कोर्टातून जामीन:वेरूळचे शिक्षक बोरसे मृत्यू प्रकरणी तपास सीआयडीकडे



वेरूळ येथील शिक्षक सुरेश बोरसे यांच्या पोलिसांच्या मारहाणीत झालेल्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची राज्य शासनाने दखल घेतली असून गृह विभागाने या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी सर्व ८ आरोपींना २४ तासांत

.

आता माझ्या पतीला खऱ्या अर्थाने न्याय मिळू शकेल

माझ्या डोळ्यांदेखत पतीला मारहाण झाली. गुन्हे शाखा पोलिसांनी आमची फसवणूक करत आरोपींना पाठीशी घातले होते. मात्र आता तपास सीआयडीकडे गेल्यामुळे माझ्या पतीला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल आणि दोषी पुन्हा गजाआड होतील हीच आमची अपेक्षा आहे. -अनिता बोरसे, मृताची पत्नी

वेरूळमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचा फौजफाटा

तपास हाती घेताच सीआयडीचे पोलिस अधीक्षक यशवंत काळे, पोलिस उपअधीक्षक रवींद्र पिंगळे व पथकाने थेट घटनास्थळी धाव घेतली. प्रत्यक्षदर्शी आघाडे कुटुंबाची चौकशी करून १० जूनच्या रात्री नेमके काय घडले याची माहिती घेत बोरसे कुटुंबाचीही भेट घेतली. कुटुंबाने संबंधित पोलिस आणि गुंडांवर खुनाचा गुन्हा दाखल करून न्याय द्यावा, अशी विनंती केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *