Headlines

लोणी खुर्द येथे शिव रस्ता मोकळा करण्यासाठी उपोषण:तहसीलदारांच्या आश्वासनानंतर उपोषण स्थगित‎




वैजापुर तालुक्यातील तलवाडा, बाभुळतेल, लोणी खुर्द येथील शिव रस्ता मोकळा करून नागरिकांना वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा, या मागणीसाठी गोकुळ मगर व शेतकरी महिलांच्या वतीने करण्यात आलेले उपोषण तहसीलदार सुनील सावंत यांच्या सकारात्मक आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून संबंधित रस्त्यावरील अतिक्रमण व अडथळ्यांमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत होता. याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्थानिक नागरिकांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला. उपोषणस्थळी तहसीलदार सुनील सावंत यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी संबंधित विभागांशी समन्वय साधून मोजणी करूण रस्ता मोकळा करण्यासाठी आवश्यक ती कारवाई तातडीने करण्यात येईल, असे आश्वासन दिले. प्रशासनाच्या या भूमिकेनंतर आंदोलनकर्त्यांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला. यावेळी पोलिस निरीक्षक सी. एच. मे़डके, भागीनाथ मगर, अजय पाटिल सांळुके, कीशोर मगर, दादाभाऊ तांबे, सचिन तांबे, सोमनाथ मगर, संजय गायके, तलाठी चि़चोले, राठोड, लोणकर, जालिंदर वाघ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. आश्वासनामुळेपरिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *