Headlines

घाटनांद्र्यातील तरूणांची भारतीय सैन्य दलात निवड:शिवजयंती उत्सव समितीकडून जंगी सत्कार‎




घाटनांद्रा येथील तीन भूमिपुत्रांची भारतीय सैन्य दलात निवड झाली असून संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. नितीन दगडूबा कापसे, बळीराम चंद्रभान गोंधळे आणि अर्जुन सुभाष मोरे या तिघांची सैन्यात निवड झाल्याबद्दल शुक्रवारी शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळील बसस्थानक परिसरात त्यांचा शाल व श्रीफळ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. देशसेवेचे स्वप्न बाळगलेल्या या तिनही युवकांचे ग्रामस्थांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत गावाचे नाव उंचावल्याबद्दल अभिनंदन केले. या कार्यक्रमाला शिव स्मारक समिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिगंबर मोरे, राजाराम पालोदकर, अशोक मोरे, रमेश मोरे, सुरेश शिंदे, विक्रम शिंदे, सुभाष सुरडकर, कारभारी मोरे, गोरख मोरे, रंगणाथ गोंधळे, रघुनाथ मोरे, सागर मोरे, सचिन जैस्वाल यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *