![]()
शिवना सिल्लोड-सोयगाव विधानसभेचे दिवंगत माजी आमदार किसनराव काळे यांच्या अकराव्या पुण्यस्मरणानिमित्त कै. लक्ष्मणराव पाटील व कै.गजानन विद्यालयाच्या वतीने बुधवारी संत धोंडिबा महाराज संस्थान येथे माजी विद्यार्थ्यांचा कृतज्ञता सोहळा पार पडला. प्रथम भीमराव काळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून किसनराव काळे यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी कृतज्ञता म्हणून गरीब, होतकरू मुलांना शालेय गणवेश व साहित्य भेट दिले. मधुकर काळे यांनी सांगितले कि, त्यांच्या विचारांचा वारसा जपणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. ग्रामस्थांनी काळे यांच्या आठवणीना कार्यक्रमात उजाळा दिला. देशसेवेसह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मनोबल वाढावे या हेतूने भाजपचे माजी उपसभापती अरुण काळे यांनी दहावी वर्गात प्रथम आलेल्या चैताली गणेश इंगळे हिला अकरा हजार रुपयांचे बक्षीस दिले. यावेळी माजी उपसभापती अरुण काळे, गजानन राऊत, दीपाली काळे, सुरेश होळकर, सुनील काळे, अखिलेश गुप्ता, अनिल काळे, फौजी विष्णू काळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. किसनराव काळे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त गुरुवारी विद्यालयात आरोग्यवर्धिनी केंद्र शिवना अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. आरोग्य अधिकारी डॉ. आकाश दौड, डॉ.शिवाजी सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. धोंडिबा महाराज संस्थान येथे माजी विद्यार्थ्यांचा कृतज्ञता सोहळा पार पडला.
Source link
शिवन्यातील धोंडिबा महाराज संस्थान येथे माजी विद्यार्थ्यांचा कृतज्ञता सोहळा:गरीब-होतकरू मुलांना गणवेश, शालेय साहित्य भेट