Headlines

पाऊस लांबल्याने फुलंब्री तालुक्यातील भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात:तालुक्यात केवळ 18 हेक्टरवरच कपाशीची लागवड‎




दरवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महागडे बियाणे खरेदी करून, उन्हाचा चटका सोसत भाजीपाल्याची लागवड करायची आणि पुढे बाजारात चांगला भाव मिळवून सुगीचे दिवस पाहायचे, या आशेने फुलंब्री तालुक्यातील शेतकरी दरवर्षी भाजीपाल्याची लागवड करतात. मात्र, यावर्षी पावसाने मारलेली प्रदीर्घ दडी आणि निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांचा हा अंदाज पूर्णपणे अंगलट आला असून तालुक्यातील भाजीपाला उत्पादक शेतकरी भीषण संकटात सापडले आहेत. कडक ऊन आणि पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे कोबीच्या पिकाची वाढ पूर्णपणे थांबली आहे. त्यातच भेंडी आणि इतर वेलवर्गीय भाजीपाला पिकांना उष्णतेच्या तीव्रतेमुळे फुलेच लागत नसल्याचे विदारक चित्र तालुक्यात पहायला मिळत आहे. लागवडीचा खर्च तर दूरच, पण घातलेले भांडवलही वसूल होणार नसल्याने उत्पादन शून्य होण्याच्या भीतीने फुलंब्री तालुक्तीयातील शेतकरी पुरता हतबल झाला आहे. आता बळीराजाला चातकासारखी प्रतीक्षा आहे ती फक्त एका दमदार पावसाची. जोरदार पाऊस पडेल आणि पिक वाचेल ही आशा त्यांना आहे. फुलंब्री तालुक्यातील भेंडी आणि कोबींसारख्या भाजीपाला पिकांना उष्णतेच्या तीव्रतेमुळे फुलेच लागत नसल्याचे चित्र आहे. अवघ्या ५०० हेक्टरवर पेरणी फुलंब्री तालुक्यात एकूण पेरणीयोग्य क्षेत्र ५६ हजार ७११ हेक्टर इतके प्रचंड आहे. यंदा मान्सून लांबल्याने खरिपाचा हंगाम पूर्णपणे कोलमडला आहे. तालुक्यात आतापर्यंत केवळ ५०० हेक्टरवरच कशीबशी लागवड झाली असून, यात सर्वाधिक ३०० हेक्टरवर शेतकऱ्यांनी भाजीपाला लावला आहे. याशिवाय १८९ हेक्टरवर आले (अद्रक), १९४ हेक्टरवर तूर आणि अवघ्या १८ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे. पाऊस झाल्याशिवाय पेरणी न करण्याच्या सूचना Ãशेतकऱ्यांनी ६० ते १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय शेतात कोणतीही नवीन पेरणी करू नये. लागवडीसाठी कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची निवड करावी. भाजीपाला वाचवण्यासाठी फक्त सकाळी किंवा सायंकाळच्या वेळीच ठिबकने पाणी द्यावे. -पंकज वाकळे, प्रभारी तालुका कृषी अधिकारी, फुलंब्री



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *