Headlines

जलजीवनवर कोट्यवधींचा खर्च, तरीही घाटनांद्रावासीयांना 15 दिवसांआड पाणी:वृद्ध, महिलांसह लहान मुलांना पाण्यासाठी करावी लागते भटकंती‎



सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा गावात जून महिन्यात पाणीटंचाईने उग्र स्वरूप धारण केले आहे. ग्रामस्थांना तब्बल १५ दिवसांआड केवळ अर्धा तास मिळणाऱ्या पाणीपुरवठ्यावर समाधान मानावे लागत असून, पाण्यासाठी महिला, वृद्ध आणि लहान मुलांना भटकंती करावी लागत आहे.

.

गावाची वाढती लोकसंख्या पाहता, तत्कालीन सरपंच निर्मलाबाई तडवी यांनी अतिरिक्त विहिरी अधिग्रहित करण्याचा ठराव मांडला होता. मात्र, त्यांचा कार्यकाळ संपताच हा ठराव धूळ खात पडला आहे.

प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून प्रलंबित विहीर अधिग्रहण मार्गी लावावे आणि गावातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी घाटनांद्रावासीयांकडून केली जात आहे.

योजना ठरली फोल दोन वर्षांपूर्वी ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत १ कोटी ८० लाख रुपये खर्च करून गावात पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली. प्रत्येक घरापर्यंत मुबलक पाणी पोहोचविण्याचे आश्वासन मिळाले, मात्र आज प्रत्यक्षात १५ दिवसांआड अवघा अर्धा तास पाणी मिळत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. खाजगी टँकरचे पाणी विकत घेणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे.

कारवाई करण्यात येईल Ãपाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी संबंधित विभागाशी समन्वय साधला जात असून, पर्यायी स्रोत आणि विहीर अधिग्रहणाबाबतही आवश्यक ती कारवाई केली जाईल. ग्रामस्थांचा त्रास कमी कसा होईल, यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. – प्रभाकर धुड , ग्रामविकास अधिकारी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *