![]()
खडकवासला धरण भरल्यानंतर सालाबादप्रमाणे पुणे महानगरपालिकेतर्फे खडकवासला जलाशय येथे जलपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा व्हावा, तसेच नागरिकांना वर्षभर मुबलक पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने विधिवत जलपूजन करण्यात आले.यावेळी आमदार भीमराव तापकीर आणि पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. या प्रसंगी पुणे महानगरपालिकेचे उपमहापौर परशुराम वाडेकर, सभासद सचिन मोरे, सोपान ऊर्फ काका चव्हाण, जयश्री भूमकर, राजाभाऊ लायगुडे, कोमल नवले, प्रसन्न जगताप, अनिता इंगळे, सुभाष नानेकर, धनश्री कोल्हे, भारत भूषण बराटे तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विधिवत जलपूजन करण्यात आले. याप्रसंगी माननीय महापौर मंजुषा नागपुरे यांनी पुणेकर नागरिकांना वर्षभर सुरळीत आणि पुरेसा पाणीपुरवठा होण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचे सांगत, यंदाचा मान्सून समाधानकारक ठरून धरणक्षेत्रात भरपूर पाऊस पडावा, अशी प्रार्थना केली.
धरणाच्या पाणी पातळीमधील झपाट्याने होत असलेली घट मुळे बुधवारी दुपारी १२:३० वा. खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये २७,२०३ क्युसेक विसर्ग कमी करून १८,२७१ क्युसेक्स इतका करण्यात येणार आहे.तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे.कोणी नदीपात्रात उतरू नये. आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागचे कार्यकारी अभियंता यांनी दिली आहे.
Source link
पुणे मनपातर्फे खडकवासला जलाशयात जलपूजन:शहराला वर्षभर पाणीपुरवठ्यासाठी चांगल्या पावसाची प्रार्थना