Headlines

Sengao Police Raid Gambling Den; Three Held, Five Flee, Rs 1.78 Lakh Seized



सेनगाव तालुक्यातील पानकन्हेरगाव शिवारात बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सेनगाव पोलिसांनी शुक्रवारी ता. 19 सायंकाळी छापा टाकला. यामध्ये तीन जणांना जुगार खेळताना रंगेहाथ पकडण्यात आले, तर पाच आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. पोलिसांनी या का

.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालु्क्यातील पानकन्हेरगाव शिवारातील अनिल जाधव यांच्या शेतातील बाभळीच्या झाडाखाली काही इसम झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून सहाय्यक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव, जमादार राजीव जाधव, सुभाष चव्हाण, जैस्वाल यांच्या पथकाने शुक्रवारी ता. 19 सायंकाळी शेतात जाऊन छापा टाकला.

यामध्ये आठ जण जुगार खेळत असल्याचे आढळून आले. पोलिस आल्याचे लक्षात येताच जुगाऱ्यांमध्ये पळापळ सुरु झाली. यामध्ये पाच जण फरार झाले तर तिघे जण पोलिसांच्या हाती लागले. पोलिसांनी घटनास्थळावरून 14 हजार रुपये रोख, तीन दुचाकी, तीन मोबाईल, रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा 1.78 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी जमादार तुकाराम मारकळ यांच्या तक्रारीवरून सेनगाव पोलिसांनी अशोक हेंद्रे, अमोल राऊतकर, शंकरराव देशमुख, अनिल जाधव, कैलास जाधव, प्रविण वाठोरे, बाबाराव मनोहर बांगर, घनश्याम दायमा (रा.पानकनेरगाव) यांच्या विरुध्द गुन्हा केला आहे,. जमादार राजीव जाधव पुढील तपास करीत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *