Headlines

Nagpur NEET Exam Peaceful Amidst Tight Security at 30 Centers


नागपूर जिल्ह्यात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली ‘राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा’ (NEET) रविवारी शांततेत पार पडली. मागील अनुभवांच्या पार्श्वभूमीवर, कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार टाळण्यासाठी जिल्हा आणि पोलीस प्रशासनाने

.

या परीक्षेसाठी नागपूर शहर आणि ग्रामीण भागासह एकूण ३० परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली होती. या केंद्रांवर तब्बल १२,५१२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षा अत्यंत पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी नागपूर पोलीस दलासोबतच पहिल्यांदाच केंद्रीय सुरक्षा दलांनाही तैनात करण्यात आले होते.

सुरक्षेचे गांभीर्य लक्षात घेता, जिल्ह्यातील ३० केंद्रांपैकी १४ केंद्रांची जबाबदारी केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) आणि स्थानिक पोलिसांवर होती. उर्वरित १६ केंद्रांवर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) आणि पोलिसांचा संयुक्त कडक पहारा होता. एकूण ४५० हून अधिक पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला होता.

शनिवारी पहाटे ५ वाजल्यापासूनच नागपूर पोलिसांनी सुरक्षेची सूत्रे हाती घेतली होती. वायुसेनेच्या विमानाद्वारे नागपुरात आणलेल्या प्रश्नपत्रिका केंद्रांवर पोहोचवण्यापासून ते परीक्षा संपेपर्यंत प्रत्येक हालचालीवर पोलिसांची करडी नजर होती. गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी शनिवारीच शहरातील सर्व झेरॉक्स केंद्र चालकांना रविवारी दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्याचे निर्देश दिले होते. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि पोलीस प्रशासनाच्या चोख नियोजनामुळे ही परीक्षा कुठलाही अनुचित प्रकार न घडता सुरळीत पार पडली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *