Headlines

Kalyan Minor Girl Gang Raped; Two Accused Arrested Under POCSO



कल्याण पूर्वेमध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि चीड आणणारी घटना घडली असून, एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच घरात दोन नराधमांनी अत्याचार केला आहे. पीडित मुलगी घरात एकटी असल्याची संधी साधून या आरोपींनी घरात घुसून हे घृणास्पद कृत्य केले. मात्र, परिसरातील जागरूक श

.

या गंभीर प्रकरणाची दखल घेत, कोळशेवाडी पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरोधात ‘पोक्सो’ (POCSO) आणि अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अधिकृतरीत्या अटक करण्यात आली आहे. पोलीस आता या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत. दरम्यान, या घटनेचे तीव्र पडसाद उमटत असून, कल्याण पूर्वेतील शिवसेनेचे नगरसेवक महेश गायकवाड आणि माया कांबळे यांनी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेतली. अशा विकृत नराधमांना थेट फाशीचीच शिक्षा देण्यात यावी, अशी आक्रमक मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

महिलांच्या सुरक्षेबाबत सरकार आणि पोलिसांचे कोणतेही ठोस धोरण नसून, ‘देवाभाऊंच्या’ राज्यात ‘लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून पंधराशे रुपये देऊन केवळ मतांचे राजकारण केले जात आहे. मात्र बहिणींच्या सुरक्षेबाबत प्रशासन पूर्णपणे उदासीन असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे. अशा गंभीर घटना घडल्यानंतर राजकीय नेते केवळ स्वतःचा स्वार्थ आणि राजकारण साधतात, असा संतापही लोकांनी व्यक्त केला. दरम्यान, या घटनेची तत्काळ दखल घेत कल्याणच्या कोळशेवाडी पोलिसांनी रीतसर गुन्हा दाखल केला असून, अटक करण्यात आलेल्या आरोपींना पुढील कारवाईसाठी कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *