Headlines

लोणच्यासाठी दररोज तब्बल 20 टन कैरीची जळगावात‎ आवक:10 ऐवजी 15 रुपये किलो कैरी फोडण्याचे दर‎, 60 रुपये किलोने विक्री‎




शहरातील बाजारपेठेत सध्या लोणच्याची‎कैरी खरेदी ‎‎करण्यासाठी ग्राहकांची झुंबड‎उडाली आहे. वर्षभर हे ‎लोणचे नागरिकांच्या‎तोंडाला चव देत असते, त्यामुळे ‎जूनमध्ये‎लोणच्याची कैरी फोडून ती खरेदी‎करण्यासाठी ‎गृहिणी व नागरिक बाजारपेठेत‎येत असतात. सध्या‎ फोडलेली लोणच्याची‎कैरी दर्जानुसार ६० ते ८० रुपये किलो ‎‎दराने‎मिळत आहे.‎ तर त्या यंदा १० ऐवजी १५ रुपये‎किलोने फाेडून मिळत आहे. घाट, छत्रपती‎संभाजीनगर व जिल्ह्यातील काही ‎भागातून‎मोठ्या आकाराच्या व पांढरा गर असलेल्या‎कैऱ्या ‎‎बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे.‎ कडक, पांढऱ्या गराच्या कैरींना पसंती‎
लोणचे वर्षभर टिकावे, त्याची चव आंबट असावी‎यासाठी गावरानी, कडक आणि ‎आतून गर असलेल्या‎कैरीला मागणी आहे. दर्जानुसार भाव ६० ते ८० रुपये आहे.‎दररोज शहरात ‎दररोज २० टन कैरीची आवक होत आहे.‎‎
– रामेश्वर माळी, विक्रेते.‎‎ कोलेस्टेराॅल आणि उच्च रक्तदाब वाढताे‎
^लाेणच्याचे सेवन मर्यादित प्रमाणात करणे ‎गरजेचे आहे.‎लोणचे ‎टिकवण्यासाठी त्यात मोठ्या प्रमाणात ‎मीठ व‎तेलाचा तर चव आणण्यासाठी‎ मसाल्यांचा वापर केला‎जातो. यामुळे ‎कोलेस्टेराॅल वाढू शकते. उच्च ‎रक्तदाब,‎अॅसिडीटीचाही त्रास होऊ ‎शकतो. त्यामुळे नागरिकांनी‎एकतर ‎लोणचे जपून सेवन करावे किंवा ते ‎खाणे टाळावे.‎
– डॉ. सुमीत पाटील, फिजिशियन कामाची गोष्ट‎: बाजारात कैरी फोडताना हे करा‎
बाजारपेठेत कैरी फोडून मिळण्याची सोय‎असल्याने घरी कैरी फोडण्याची पद्धत‎आता कालबाह्य झाली आहे. मात्र,‎बाजारात उघड्यावर ठेवलेली कैरी‎अस्वच्छ असण्याची शक्यता जास्त‎असते. जर ती तशीच फोडली, तर‎लोणचे खराब होऊ शकते. यासाठी कैरी‎आधी स्वच्छ पाण्यात नीट धुऊन घ्या.‎त्यानंतर कैरी काही वेळ सुकण्यासाठी‎ठेवून स्वच्छ कापडाने कोरडी पुसावी.‎त्यानंतर ती फाेडावी. ज्यामुळे लोणच्याची‎शुद्धता आणि गुणवत्ता वर्षभर राहते.‎‎



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *