Headlines

आंतरराष्ट्रीय योग दिन:दररोज किमान एक तास योग, प्राणायाम करणे ही काळाची गरज- कृष्णा दहेतकर, घाटनांद्रा येथील शाळांत विद्यार्थ्यांनी केली योग प्रात्यक्षिके‎




निरोगी आणि सुदृढ जीवनासाठी केवळ आंतरराष्ट्रीय योग दिनापुरतेच मर्यादित न राहता, प्रत्येकाने दररोज किमान एक तास योग व प्राणायाम करणे ही आजच्या काळाची गरज आहे, असे प्रतिपादन घाटनांद्रा येथील जिल्हा परिषद प्रशालेचे मुख्याध्यापक कृष्णा दहेतकर यांनी केले. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी घाटनांद्रा येथील जिल्हा परिषद प्रशाला, इंद्रगढी प्राथमिक शाळा, जोगेश्वरी माध्यमिक विद्यालय, नॅशनल मराठी शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, एकता उर्दू प्राथमिक शाळा आणि मौलाना आझाद उर्दू शाळांमध्ये रविवारी आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे, रविवार हा सुट्टीचा दिवस असूनही विद्यार्थ्यांनी शालेय मैदानावर अभूतपूर्व गर्दी करत योग साधनेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांचा हा उत्साह सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. नियमित योगामुळे शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. याचा बुद्धीवर चांगला परिणाम होऊन शारीरिक तंदुरुस्ती टिकून राहते. विद्यार्थ्यांनी दैनंदिन अभ्यासासोबतच आरोग्याला प्राधान्य द्यावे, असे मुख्याध्यापक कृष्णा दहेतकर यांनी सांगितले. या कार्यक्रमाला मुख्याध्यापक कृष्णा दहेतकर यांच्यासह भरत सुपेकर, जितेंद्र गायकवाड, संदीप सपकाळ, कय्युम शहा, शेख इब्राहिम, शंकर पारखे, लक्ष्मीकांत साळवे, अमोल चौधरी, संदीप मोरे, सागर ठाकरे, विजय पानतावणे, गुंफा आंदे, रुपाली पाटील व सविता पवार आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. परिसरातील सर्वच शाळांमध्ये प्राणायाम आणि योगासने करून आरोग्याचा संदेश देण्यात आला. झुंबा नृत्यासह विद्यार्थ्यांनी केली विविध योगासने सकाळी ८ ते ९ या वेळेत योग प्रशिक्षक किरण बोरसे, अविनाश देशमुख आणि रितेश महाले यांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक योग सत्र पार पडले. या वेळी विद्यार्थ्यांनी भ्रामरी, अनुलोम-विलोम, कपालभाती या प्राणायामांसह आधुनिक पद्धतीच्या झुंबा नृत्याच्या तालावर विविध योगासने करत उपस्थितांची मने जिंकली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *