Headlines

हरियाणा येथील मराठा जागृती मंच पदाधिकाऱ्यांचे अंजनगावात स्वागत:शाल, पुष्पगुच्छ व महापुरुषांची पुस्तके भेट देऊन केला सत्कार‎




अखिल भारतीय मराठा जागृती मंच, हरियाणाचे युवा प्रदेशाध्यक्ष राजवीरसिंह चोपडे व जिल्हाध्यक्ष सतवीरसिंह चोपडे यांनी अंजनगाव सुर्जी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी प्रेमकुमार बोके यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी गुरुदेव सेवा मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते विजय बोके, मराठा सेवा संघाचे कार्यकर्ते बाळासाहेब गोंडचवर,पत्रकार रमेश सावळे, नगरसेवक सुयोग खाडे तसेच उपस्थित सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने राजवीरसिंह चोपडे व सतवीरसिंह चोपडे यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि महापुरुषांचे प्रेरणादायी पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना राजवीर चोपडे यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जन्मभूमी सिंदखेड राजा येथून मिळणारी प्रेरणा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य संकल्पनेचा वारसा देशभर पोहोचविण्याचे कार्य सुरू असल्याचे सांगितले. तर सतवीर चोपडे यांनी पानिपतच्या तिसऱ्या युद्धातील मराठा वीरांच्या शौर्य, त्याग आणि बलिदानाची माहिती उपस्थितांना दिली. यावेळी नगरसेवक सुयोग खाडे यांनी समाजातील युवकांनी महापुरुषांचे विचार आत्मसात करून सामाजिक बांधिलकी जपावी, असे आवाहन केले. या प्रसंगी प्रेमकुमार बोके, बाळासाहेब गोंडचवर,रमेश सावळे, अरुण धोटे,सीमा बोके,सारिका मानकर,सारिका धामोडे,शुभांगी पांडे, शीतल बोके,जयेंद्र गाडगे, प्रवीण बोके,नगरसेवक सुयोग खाडे,मनोज मेळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *