Headlines

महाराष्ट्राचा सूर हरपला:ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंचे निधन, उद्या दुपारी 4 वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार-आशिष शेलार




ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे आज दुःखद निधन झाले. त्या हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल होते. आशा भोसले यांचे सुपुत्र आनंद भोसले म्हणाले, माझी आई आशा भोसले यांचे निधन झाले आहे. उद्या सकाळी 11 ते 2 या वेळेत त्या जिथे राहायच्या तिथे त्यांचे दर्शन घ्यावे आणि उद्या दुपारी 4 वाजता शिवाजी पार्कला अंतिम संस्कार होणार आहेत. मंत्री आशिष शेलार म्हणाले, आज संपूर्ण देश आणि महाराष्ट्र दुःखाड बुडाला आहे. एका युगाचा अंत झाला आहे, आपल्या आशा ताई आपल्यातून निघून गेल्या आहेत. आशा ताईंचे असणे हेच आपल्या सगळ्यांना वर्षानुवर्ष समाधानाची अनुभूती देत होते. त्यांचे वैयक्तिक आयुष्य आणि त्यांचा प्रवास, दुःखाला स्वतः कवटाळून आणि दुसऱ्याला सुख देण्याचे काम त्यांनी केले होते. त्यांचे संगीत क्षेत्रातल्या कर्तुत्वाने संपूर्ण जगाला वेड लावले होते. आज मेडिकलच्या सर्व प्रक्रिया झाल्यानंतर उद्या सकाळी 11 वाजता शिवाजी पार्कच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. शासकीय इतमामात हा अंत्यसंस्कार होणार आहे. अशोक सराफ यांनी जागावल्या आठवणी अशोक सराफ म्हणाले, ही अतिशय वाईट गोष्ट आहे. एकदा त्यांचे रेकॉर्डिंग सुरू होते. मी तिथे गेलो होतो. त्यात ‘काय’ असे म्हणायचे होते. त्यात त्यांनी मलाच म्हणायला आग्रह केला आणि मी हिम्मत करून तो शब्द त्या लावणीत म्हटला आहे. जसा मी त्यांचा जबरदस्त फॅन होतो तसंच त्या देखील माझ्या फॅन होत्या. त्यांचा स्वर कुठेही पोहोचायचा, वरच्या स्केलवर सहज जायचा. महेश कोठारेंनी व्यक्त केल्या भावना महेश कोठारे म्हणाले, फार दुःखद बातमी आहे. त्यांनी पहिल्यांदा मला प्ले बॅक दिले होते. ‘तो हा माधव बरवा’, हे गाणे त्यांनी गायले होते. मी लहान होतो तेव्हा. त्यांनी माझ्या जिवलगा चित्रपटात गाणे गायले होते, ‘जिवलगा राजसा’ हे ते गाणे होते. त्यांना आम्ही कधीच विसरू शकत नाही. असे अनेक गाणे होते, जे फक्त त्याच गाऊ शकत होत्या. अंबादास दानवे यांनी पोस्ट करत वाहिली श्रद्धाजंली शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे म्हणाले, स्वरांच्या दुनियेतील अखंड ऊर्जा आणि भारतीय पार्श्वगायनाचा देदीप्यमान तारा म्हणजे ‘आशाताई’! शास्त्रीय बाजाची गाणी असोत किंवा रिदमिक पॉप, आशा भोसले यांनी आपल्या आवाजाच्या जादूने सहा दशकांहून अधिक काळ रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवले आणि गाजवत राहणार. त्यांच्या संगीतातील अष्टपैलुत्वाला मानाचा मुजरा! भावपूर्ण श्रद्धांजली. गायिका पद्मजा फेणाणी यांनी व्यक्त केल्या भावना गायिका पद्मजा फेणाणी म्हणाल्या, कल्पना होती कालपासून की त्यांची तब्येत बरी नाहीये. लता मंगेशकर यांच्या नंतर आशा भोसले यांनी स्वतःचे वेगळे व्यक्तिमत्त्व घडवले होते. त्यांनी हजारी गाणी गाऊन विक्रम केला आहे. खूप कठीण परिस्थितीत त्यांनी आयुष्य काढले आहे. आजच्या सारखे स्टुडिओ तेव्हा नव्हते, परंतु, त्या स्टुडिओमध्ये सुद्धा लाईव्ह परफॉर्म करणे खूप कठीण होते. मी ही बरीच गाणी लाईव्ह केली आहेत, त्यामुळे मला माहीत आहे किती कठीण असते ते. नंदलाला रे हे अतिशय कठीण असे गाणे होते आणि मला ते खूप आवडते. माझी आणि त्यांची अनेकवेळा भेट व्हायची. अतिशय प्रेमाने त्या भेटायच्या. त्यांनी एकदा माझ्यासाठी सोनचाफा आणला होता अन त्या फुलांचा सुगंध आणि त्या आठवणी अजूनही माझ्यासोबत आहेत आणि राहणार. बंगालने देखील त्यांना बंग विभूषण देऊन त्यांचा सन्मान केला- छगन भुजबळ छगन भुजबळ म्हणाले, केवळ हिंदी गाणीच नाही तर विदेशातली देखील त्यांनी गाणी गायली आहेत. त्यांना दादासाहेब फालके पुरस्कार देखील मिळाला आहे. महाराष्ट्र भूषण देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहेच, पण बंगालने देखील त्यांना बंग विभूषण देऊन त्यांचा सन्मान केला होता. पॉप, भजन, क्लासिकल, चित्रपट गीत असे अनेक गाणी त्यांनी गायली आहेत. आम्ही हे सातत्याने अपडेट करत आहोत…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *