![]()
येथे माहेश्वरी समाजाच्या वतीने महेश नवमी उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त धार्मिक विधी, विविध स्पर्धा, समाजभूषणांचा गौरव आणि भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. वाढते प्रदूषण लक्षात घेता यंदा प्रथमच काढण्यात आलेली पर्यावरणपूरक ईव्ही (इलेक्ट्रिक) बाईक रॅली हे यंदाच्या महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले. सकाळी बालाजी मंदिर आणि हरिहरेश्वर मंदिर येथे मंत्रघोषात भगवान महेश यांच्या मूर्तीचा महाअभिषेक व महाआरती करण्यात आली. संध्याकाळी सुशोभित रथातून फटाक्यांच्या आतिषबाजीत भगवान महेश यांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. पारंपरिक वेशभूषेतील महिला आणि पुरुषांच्या सहभागाने शोभायात्रेची शोभा वाढवली; विशेषतः महिलांची एकसारखी वेशभूषा लक्षवेधी ठरत होती. यावेळी जिल्हा परिषद सदस्य शिवराज भुमरे, शिवराज पारिख, भूषण कावसनकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी भगवान महेश यांच्या चरणी पुष्पहार अर्पण करून शुभेच्छा दिल्या. शोभायात्रेदरम्यान वीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यात आले. पेट्रोलचा वाढता खर्च आणि प्रदूषण टाळण्यासाठी यंदा बालाजी मंदिर ते महेश चौकापर्यंत भव्य ईव्ही बाईक रॅली काढण्यात आली. जयनारायण लोहिया यांच्या हस्ते या रॅलीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय पोरवाल यांनी केले. महाप्रसादाचे आयोजन राधेश्याम तोष्णीवाल यांनी केले होते, तर ऋषिकेश लखोटिया यांनी आभार मानले. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी राजस्थान युवक मंडळ, युवा संघटन आणि महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. विविध स्पर्धा, गुणवंत, स्पर्धा परीक्षेत यश मिळवणाऱ्यांचा सत्कार विविध स्पर्धा, गुणवंतांचा गौरव माहेश्वरी भक्तनिवास येथे आयोजित मुख्य कार्यक्रमात जिल्हा उपाध्यक्ष सचिन लखोटिया, जयनारायण लोहिया यांच्यासह समाजातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते. नवमीनिमित्त आयोजित वेशभूषा, भजन आणि लुडो स्पर्धांमधील विजेत्यांना; तसेच यूपीएससी परीक्षेत यश मिळवलेला हर्ष लखोटिया आणि कृषी उपसंचालक परीक्षेत उत्तीर्ण माधव राठी या गुणवंतांचा विशेष सन्मान करण्यात आला.
Source link
पैठणमध्ये महेश नवमी उत्साहात साजरी:पर्यावरणपूरक ईव्ही बाइक रॅलीचे मुख्य आकर्षण, आतषबाजीत भगवान महेश यांची शोभायात्रा