![]()
सध्या पावसाने दडी मारल्याने परिसरातील शेतकरी चिंतेत आहेत. पावसाअभावी बार्शी तालुक्यातील पिंपळगाव ढाळे प्रकल्पातील पाणीसाठ्यात लक्षणीय घट झाली असून, तीव्र उन्हामुळे तळ्यातील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे प्रमाण द
.
पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन संबंधित प्रशासनाने तळ्यातील पाणी दररोज केवळ दोन तास उपसा करण्याची परवानगी दिली आहे. त्यातच विजेच्या काही अडचणी निर्माण झाल्या तर मिळाणाऱ्या दोन तासांतील पाणी देखील मिळणे अवघड होत आहे. त्यामुळे या निर्णयामुळे शेतकऱ्यांना सिंचनाचे नियोजन करावे लागत असून खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर चिंता वाढली आहे. तर सध्या शेतात असणारे ऊस पीक हे पाण्याअभावी व उन्हामुळे जळून जाण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, लवकरात लवकर समाधानकारक पाऊस झाला नाही तर पिकांसह जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.या निर्णयामुळे शेतकऱ्यांना सिंचनाचे नियोजन करावे लागत असून खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर चिंता वाढली आहे.
पाण्याअभावी पिके करपून जाण्याची शक्यता ^पाऊस उशिरा होत असल्याने पेरणीची चिंता आहे, त्यातच पिंपळगाव ढाळे प्रकल्पातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. त्यामुळे पंप दोनच तास चालवण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे शेतातील जी पिके आहेत, ती पाण्याअभावी व उन्हामुळे करपून जाण्याची शक्यता आहे. धन्यकुमार मोरे, शेतकरी, साकत
मध्यम प्रकल्प येथील पाणी पातळी खूप कमी ^पिंपळगाव ढाळे मध्यम प्रकल्प येथील पाणी पातळी खूप कमी झाली आहे. जे पाणी शिल्लक आहे, ते पाणी जनावरांना पाण्याची सोय व्हावी तसेच पिण्यासाठी पाणी पुरवठा व्हावा यासाठी कृषी पंप दोनच तास चालू राहावे, यासाठी वीजपुरवठा होणार आहे. – विराज परदेशी, उपविभागीय अभियंता, पाटबंधारे उपविभाग, बार्शी