Headlines

शिर्डीतील रेल्वेस्थानकाचा 60 कोटींतून कायापालट:सिंहस्थ कुंभमेळ्याची चाहूल, दोन नवीन फलाट व पाच स्टेबलिंग लाइन उभारणार‎



आगामी नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, रेल्वे प्रशासनाने शिर्डी (साईनगर) रेल्वेस्थानकाच्या विस्ताराची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. कुंभमेळ्यासाठी देश-विदेशातून येणारे लाखो भाविक साई दर्शनासाठी शिर्डीत येतात. ही संभाव्य गर्दी लक्षा

.

सध्या शिर्डी स्थानकावर तीन फलाट कार्यरत आहेत. नव्या योजनेअंतर्गत चार आणि पाच क्रमांकाचे दोन आधुनिक आयलँड फलाट उभारले जातील. तसेच रेल्वे गाड्यांच्या पार्किंग आणि देखभालीसाठी पाच नवीन स्टेबलिंग लाइन तयार करण्यात येणार आहेत. यामुळे एकाच वेळी अधिक गाड्या हाताळणे शक्य होईल आणि रेल्वे वाहतुकीवरील ताण कमी होईल.

साईनगर शिर्डी स्थानकावरून सध्या दररोज चार रेल्वेगाड्या सुटतात. विस्तार प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नवीन गाड्या सुरू करण्यास मोठी मदत होणार असून, देशभरातून शिर्डीसाठी रेल्वे कनेक्टिव्हिटी मजबूत होईल. रेल्वे प्रशासनाने या प्रकल्पाचे काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यामुळे शिर्डी रेल्वेस्थानक हे उत्तर महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे आणि आधुनिक रेल्वे केंद्र म्हणून विकसित होणार आहे. {६० कोटींचा खर्च: प्रकल्पासाठी रेल्वे प्रशासनाकडून भरीव निधीची तरतूद. { क्षमता वाढणार: सध्याच्या ३ फलाटांवरून आता ५ फलाट होणार; एकाच वेळी अधिक गाड्यांचे नियोजन शक्य. { कनेक्टिव्हिटी वाढणार: प्रकल्प पूर्ण झाल्यावर देशभरातून शिर्डीसाठी नव्या रेल्वे गाड्या सुरू होणार.

शिर्डी स्थानकातून वर्षाला ६ लाखांवर भाविकांचा प्रवास शिर्डी स्थानकातून दरवर्षी ६ लाखांहून अधिक साईभक्त प्रवास करतात. यातून रेल्वे प्रशासनाच्या तिजोरीत सुमारे २० कोटी रुपयांचे वार्षिक उत्पन्न जमा होते. सध्या शिर्डीहून आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटक, ओडिशा, पश्चिम बंगाल, पंजाब आणि हिमाचल प्रदेश या राज्यांसह मुंबई, नवी दिल्ली, भोपाळ, झांशी, भुवनेश्वर आदी शहरांसाठी थेट रेल्वे सेवा उपलब्ध आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने सुविधा वाढविण्याचे नियोजन सुरू केले आहे. सिंहस्थ काळात उपलब्ध रेल्वे सेवा दुपटीने वाढविण्याची तयारी करण्यात येत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *