![]()
भारताची डिजिटल वित्तीय प्रणाली वेगाने विस्तारत असताना सायबर धोके, फसवणूक आणि डेटा सुरक्षेची गंभीर आव्हाने समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्यावतीने मुंबईत दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद ‘ICAI-भारत DIGIT 2026
.
ठोस निष्कर्ष दिले पाहिजेत
रवी मितल म्हणाले की, आजच्या डिजिटल युगात दिवाळखोरीशी संबंधित फॉरेन्सिक तपास, डिजिटल पुरावे मिळवणे, मालमत्ता शोधणे आणि टाळता येण्याजोगे व्यवहार शोधणे अत्यंत कठीण झाले आहे. या आव्हानांचा सामना करण्यासाठी ICAI आणि IBBI ने संयुक्तपणे काम करण्याची गरज आहे. केवळ कायदेशीर नियमांचे अनुपालन करण्यापुरते मर्यादित न राहता, सीए आणि वित्तीय तज्ज्ञांनी संभाव्य धोके आणि जोखमींची आधीच ओळख करून त्यावर ठोस निष्कर्ष दिले पाहिजेत.
ICAI ची कामगिरी जागतिक पातळीवर अग्रणी- अतुल कुमार गोयल
अतुल कुमार गोयल यांनी ICAI च्या कार्याचा विशेष गौरव केला. “Forensic Accounting and Investigation Standards (FAIS) आणि Information Systems Audit Standards (ISAS) यांसारखी उच्च दर्जाची मानके विकसित करणारी ICAI ही जगातील पहिली व्यावसायिक संस्था ठरली आहे. सर्व बँका, वित्तीय संस्था आणि अंमलबजावणी यंत्रणांनी आपल्या तपास व ऑडिटकार्यात या मानकांचा अवलंब केला पाहिजे, ज्यामुळे तपासात अधिक सुसंगतता, गुणवत्ता आणि विश्वासार्हता येईल, असे मत त्यांनी मांडले.
उदयोन्मुख तंत्रज्ञानावर मंथन
दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत ब्लॉकचेन, व्हर्च्युअल डिजिटल अॅसेट्स, डिजिटल पुरावे, सायबर लवचिकता आणि डिजिटल तपासातील नवीन तंत्रज्ञानावर प्रात्यक्षिकांसह सखोल चर्चा सत्रे आयोजित करण्यात आली आहेत.
प्रमुख यंत्रणांचा महासंगम
या परिषदेला देशपातळीवरून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. गृह मंत्रालयाचे I4C, CERT-In, NCIIPC या सायबर सुरक्षा संस्थांसह रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, सेबी, सीएजी आणि एनसीएलटी यांसारख्या नियामक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. विशेष म्हणजे गंभीर वित्तीय गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या SFIO आणि CID यांसारख्या अंमलबजावणी यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनीही यात सहभाग नोंदवला.
मजबूत आणि सुरक्षित डिजिटल अर्थव्यवस्थेच्या उभारणीसाठी सर्व यंत्रणांना एकाच व्यासपीठावर आणून ज्ञानाची देवाणघेवाण करणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे. या परिषदेच्या उद्घाटन सत्राला IBBIअध्यक्ष रवी मितल, तर इंडियन बँक्स असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल कुमार गोयल, ICAI च्या डिजिटल अकाउंटिंग अँड अॅश्युरन्स बोर्डाचे अध्यक्ष सीए दयानिवास शर्मा आणि इन्सॉल्व्हन्सी, बँकरप्सी अँड व्हॅल्युएशन स्टँडर्ड्स बोर्डाचे अध्यक्ष सीए दुर्गेश कुमार काबरा यांची उपस्थिती होती.