Headlines

बचतगटांमुळे महिलांचे आर्थिक व सामाजिक सक्षमीकरण- गडाख:गणेशवाडीत महिला बचतगट मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद‎




बचतगटांमुळे महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळण्याबरोबरच नेतृत्वगुण विकसित होण्यास मोठी मदत होते. बचतगटातील प्रत्येक महिला दरमहा ठराविक रक्कम जमा करते. या जमा झालेल्या निधीतून गरजू महिलांना कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जाते. तसेच चांगल्या प्रकारे कार्यरत असलेल्या बचत गटांना बँकांकडून विनातारण कर्जही मिळते. या कर्जाच्या माध्यमातून महिला जोडधंदे व लघुउद्योग सुरू करून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनतात, असे प्रतिपादन पंचायत समितीच्या माजी सभापती सुनिता गडाख यांनी केले. गणेशवाडी येथे विकास महिला ग्राम संघाच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. बचतगटांमुळे महिलांचे आर्थिक, सामाजिक आणि राजकीय सक्षमीकरण होत असून त्यांच्यामध्ये निर्णयक्षमता व नेतृत्वगुण वाढीस लागतात. महाराष्ट्र शासन व केंद्र शासनामार्फत बचतगटातील महिलांसाठी विविध योजना व अनुदाने उपलब्ध करून दिली जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी तालुका अभियान व्यवस्थापक अर्जुन सोनवणे, क्लस्टर प्रमुख नितीन पंडित, ग्रामसखी सुवर्णा जगन्नाथ आव्हाड, खरवंडी क्लस्टरमधील सर्व ग्रामसखी, प्रभाग संघ व्यवस्थापक शीतल सोनवणे, विकास महिला ग्राम संघाच्या अध्यक्षा सरिता गडाख, सचिव सुनिता तांदळे, कोषाध्यक्ष सविता बारवेकर, अंगणवाडी सेविका अलका दरंदले, अलका तांदळे, आशा सेविका शोभा लोहकरे, सरिता काळे, सरपंच कैलास दरंदले, आदिनाथ तांदळे, कृष्णा तांदळे, आसाराम आव्हाड, मधुकर दरंदले आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष निमसे यांनी केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *