![]()
गणेशमूर्तींसाठी ‘फिटनेस प्रमाणपत्र’ अनिवार्य करण्यात येणार असल्याचे, तसेच गणेशमूर्तीच्या जडणघडणीपासून ते मूर्तीची मंडळाला डिलिव्हरी होईपर्यंतची संपूर्ण माहिती ठेवणे बंधनकारक करण्यात येणार असल्याचे वृत्त विविध समाजमाध्यमांवर तसेच काही ठिकाणी प्रसारित होत आहे. मात्र, सदर वृत्त वस्तुस्थितीला धरून नसून, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून अशा प्रकारचे कोणतेही निर्देश देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे गणेशोत्सव मंडळ तसेच गणेशभक्तांनी अशा माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे. एक टनापेक्षा अधिक वजनाच्या गणेशमूर्तींसाठी फिटनेस प्रमाणपत्र अनिवार्य करण्याबाबत अथवा मूर्तीच्या जडणघडणीपासून ते तिच्या वितरणापर्यंतची संपूर्ण माहिती नोंदविणे बंधनकारक करण्याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेने कोणताही निर्णय घेतलेला नाही किंवा अशा स्वरूपाचे कोणतेही निर्देश जारी केलेले नाहीत. त्यामुळे या संदर्भात समाजमाध्यमांवर प्रसारित होत असलेल्या संदेशांवर अथवा वृत्तांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात येत आहे. सुरक्षित गणेशोत्सवासाठी बीएमसी सज्ज दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्तींच्या आगमनादरम्यान सुरक्षिततेची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. गणेश मंडळांनी गणेशमूर्तींच्या आगमन सोहळ्याचे नियोजन करताना पोलीस विभाग, वाहतूक विभाग तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्याशी समन्वय साधावा, असे आवाहनही महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. गणेशोत्सव उत्साहात, सुरक्षित आणि सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्व गणेश मंडळांनी संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असेही महानगरपालिकेने नमूद केले आहे. हे ही वृत्त वाचा गणपतीत आता गरबा खेळायचा बाकी राहिलाय!:लालबागचा राजा मंडळावर संदीप देशपांडेंचा हल्लाबोल; म्हणाले- मराठी सण गुजरात्यांच्या हातात देणार का?
मुंबईतील गणेशोत्सवाला सध्या येत असलेल्या कॉर्पोरेट स्वरूपावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते संदीप देशपांडे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “गणेशोत्सव हा मराठी मातीतील आणि मराठी माणसाचा सण आहे. मात्र, लालबागचा राजा आणि चिंतामणी यांसारखी मंडळे उद्योगपतींना सल्लागार म्हणून नेमून गणेशोत्सवाला कॉर्पोरेट वॉरचे ठिकाण बनवत आहेत. उद्या गणेशोत्सवात आपण फक्त गरबा बघायचा का?” असा बोचरा सवाल त्यांनी उपस्थित केला. बुधवारी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत संदीप देशपांडे यांनी गणेशोत्सवातील वाढते कॉर्पोरेट वर्चस्व, एमपीएससी पेपरफुटी आणि कंत्राटदारांचे रखडलेले पेमेंट यांसारख्या विविध ज्वलंत मुद्द्यांवर सरकार आणि संबंधित प्रशासनाला धारेवर धरले.वाचा सविस्तर
Source link
गणेशमूर्तींसाठी ‘फिटनेस प्रमाणपत्र’ अनिवार्य असल्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नका:बीएमसीने फेटाळले सोशल मीडियावरील दावे, गणेश मंडळांना सहकार्य करण्याचे आवाहन