![]()
पत्रकारांना शिवीगाळ आणि धमकी दिल्याच्या प्रकरणावरून खासदार संजय दिना पाटील यांच्याभोवती निर्माण झालेल्या वादावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. संजय दिना पाटील यांच्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर आपणही दिलगिरी व्यक्त करतो, असे सांगतानाच त्यांनी यापुढे असे वक्तव्य होणार नाही आणि संजय दिना पाटील यांनीही माफी मागितली असल्याचे स्पष्ट केले. माध्यमांशी संवाद साधताना उदय सामंत म्हणाले, “संजय दिना पाटील यांचा विषय आता इथेच थांबवावा. त्यांच्या वक्तव्यामुळे कुणाचे मन दुखावले असेल तर मीही दिलगिरी व्यक्त करतो. त्यांनी स्वतः माफी मागितली आहे आणि यापुढे ते असे काही बोलणार नाहीत.” एकनाथ शिंदेंमुळेच मी मंत्री! यावेळी त्यांनी स्वतःच्या राजकीय प्रवासाचाही उल्लेख केला. “एकनाथ शिंदे यांच्यामुळेच मला मंत्री होण्याची संधी मिळाली. त्यामुळे शिवसेना वाढवण्याची जबाबदारी माझ्यावर आहे,” असे सामंत म्हणाले. विजय वडेट्टीवारांच्या पक्षप्रवेशावर भाष्य
महाविकास आघाडीतील अंतर्गत घडामोडींवर बोलताना सामंत यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर महत्त्वाचे विधान केले. विजय वडेट्टीवार यांनी जर शिवसेनेत येण्याचा निर्णय घेतला, तर पक्षात एक चांगला आणि मोठा नेता येईल. महाविकास आघाडीतील नेते जर आमच्या शिवसेनेत येत असतील, तर त्यांचे नेहमीच स्वागत आहे,” असे सामंत म्हणाले. मात्र, सध्या पक्षात कोणतेही ‘ऑपरेशन’ किंवा तोडफोड सुरू नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. दरम्यान, राम मंदिरासाठी देण्यात आलेल्या देणगीवरून खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवरही उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली. राम मंदिराच्या संदर्भात करण्यात आलेल्या देणगीबाबत योग्य ती माहिती संबंधित ट्रस्टकडे उपलब्ध असून, विनाकारण संशय निर्माण करण्याची गरज नसल्याचे त्यांनी सूचित केले. हे ही वाचा.. राम मंदिर देणगीवरून संजय राऊत आक्रमक:मंदिरासाठी दिलेली चांदीची वीट कुठे? पावतीही नाही, चौकशीची मागणी
अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून देण्यात आलेल्या ४ किलो चांदीच्या विटेचा ठावठिकाणा अद्याप समोर न आल्याचा दावा करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी राम मंदिर ट्रस्टवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. सविस्तर वाचा
Source link
शिवसेनेत येणाऱ्या मविआच्या नेत्यांचे स्वागत:पण कोणतेही 'ऑपरेशन' सुरू नाही, उदय सामंत यांचे स्पष्टीकरण; संजय दिना पाटलांवरही भाष्य