![]()
लासलगाव येथील श्री बालाजी मंदिरात शुक्रवारी (दि. २६) पारंपरिक पद्धतीने ज्येष्ठाभिषेक (आंबाभिषेक) सोहळा भक्तिभावात पार पडला. श्री बालाजी भगवानांना आंब्याच्या रसाने विशेष अभिषेक करण्यात आला. आकर्षक फुलांची सजावट, धार्मिक विधी आणि मंगलमय वातावरणामुळे मंदिर परिसर भक्तिमय झाला होता. सकाळी ७ ते ९ या वेळेत झालेल्या अभिषेक सोहळ्यास लासलगाव व परिसरातील शेकडो भाविकांनी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला. यावेळी ‘श्री भक्तवत्सल गोविंदा… गोविंदा… गोविंदा’च्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला. अभिषेकानंतर महाआरती करण्यात आली तसेच भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविकांनी श्री बालाजी भगवानांच्या सेवेसाठी आंब्यांची अर्पणभावाने देणगी दिली. सोहळ्याचे नियोजन श्री बालाजी मंदिर सेवा समिती, लासलगाव यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंदिराचे पुजारी पंडित राजकुमार शास्त्री तसेच सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
Source link
‘गोविंदा… गोविंदा…’च्या जयघोषात महाआरती:लासलगावला श्री बालाजींना आंब्याच्या रसाचा ज्येष्ठाभिषेक