![]()
खंडाळा राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील शून्य ते पाच वयोगटातील २ लाख ८३ हजार ३७० बालकांना आज रविवारी पोलिओ प्रतिबंधक लस दिली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर खंडाळा येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र व जिल्हा परिषद प्रशाला यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी भव्य प्रभातफेरी काढून जनजागृती करण्यात आली. प्रभातफेरीदरम्यान नागरिकांमधील पल्स पोलिओ लसीकरणाबाबतचे गैरसमज दूर करत, आपल्या पाच वर्षांखालील बालकांना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा अंगणवाडीत नेऊन लस पाजण्याचे आवाहन करण्यात आले. या मोहिमेच्या यशस्वितेसाठी आरोग्य अधिकारी, आरोग्यसेवक-सेविका, आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि शाळांच्या माध्यमातून जनजागृती केली आहे. याप्रसंगी आरोग्यसेविका अर्चना शिंदे, आरोग्यसेवक सूरज मतसागर, आशा सेविका वंदना बागूल, अरुणा चौधरी, नीलिमा जाधव, मुक्ता भोकरे, गायत्री पुरोहित, मुख्याध्यापक अल्लाउद्दीन शेख, आदींसह विद्यार्थी उपस्थित होते. जिल्ह्यात २,२४१ बूथ उभारण्यात आले असून त्यावर ५०० पर्यवेक्षकांची नियुक्ती केली आहे. संभाजीनगर शहर ४५,९३५ सिल्लोड ४३,९६० गंगापूर ४३,७८७ कन्नड ३१,७८७ पैठण ३०,७२१ वैजापूर २४,७८८ संभाजीनगर ग्रामीण २४,७३१ खुलताबाद १८,८९५ फुलंब्री १४,१४३ सोयगाव १२,८७६ एकूण २,८३,३७० मोहीम सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. वैजापूर तालुक्यातील शिऊर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ४६ बूथवर ४ हजार ६६४ बालकांना डोस दिला जाईल, तर वैजापूर तालुक्यातील ६ प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या २३२ बूथवर २४ हजार ७८८ बालकांचे लसीकरण होईल. संपूर्ण जिल्ह्यात एकूण २,२४१ बूथ उभारण्यात आले असून त्यावर ५०० पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण २,२४१ बूथ सज्ज आहेत. यामध्ये दोन कर्मचारी असलेले ९७५ बूथ, तर तीन कर्मचारी असलेले १,२६६ बूथ कार्यरत राहतील. पालकांनी आपल्या बालकांना पोलिओ डोस देऊन पोलिओमुक्त भारत मोहिमेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. पोलिओमुक्त भारत मोहिमेत सहभागी व्हावे जिल्हा प्रशासनाची लसीकरण तयारी पूर्ण
Source link
2,241 बूथवर पावणेतीन लाख बालकांचे लसीकरण:आरोग्य विभागाकडून जनजागृतीसाठी उपक्रम, 500 पर्यवेक्षकांची केली नियुक्ती