![]()
सोलापूर जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम सभापती तथा उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांच्या पुढाकाराने सोलापूर येथील जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या सुशोभीकरणाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराज
.
शिवस्वराज्य दिनानिमित्त पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात या उद्यानाच्या विकासाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यास सकारात्मक प्रतिसाद देत पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजन समितीमधून तब्बल दोन कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे. या निधीतून उद्यानाचे स्वरूप पूर्णपणे बदलणार असून, उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराजांचा दुर्मिळ पूर्णाकृती पुतळा शहरातील प्रमुख रस्त्यांवरून सहज दिसावा यासाठी वृक्ष न तोडता त्यांना योग्य आकार देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पुढील शिवस्वराज्य दिनापर्यंत हे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
स्वातंत्र्यपूर्व काळात उभारण्यात आलेल्या या ऐतिहासिक वास्तूच्या उभारणीशी संबंधित माहिती, त्या काळातील कार्यक्रमाच्या कोनशिलावर होत्या, मात्र ही कोनशिला गायब असल्याने पुन्हा ही कोनशिला नव्याने करून इतर ऐतिहासिक नोंदी पुन्हा जतन करून उद्यानात प्रदर्शित कराव्यात, सुशोभीकरणासोबतच इतिहासालाही उजाळा मिळाल्यास भावी पिढ्यांना या स्मारकाचे ऐतिहासिक महत्त्व समजण्यास मदत होईल, असे मत रवींद्र पाटील यांनी व्यक्त केले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र पाटील यांनी या निर्णयाचे स्वागत करताना उद्यानाच्या ऐतिहासिक वारशाचे जतन करण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांनी पुढे सांगितले की, सोलापूर येथील जिल्हा परिषदेच्या उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दि. २६ जानेवारी १९३२ मध्ये त्यांचे आजोबा असणारे तत्कालीन सोलापूर लोकल बोर्डाचे अध्यक्ष शंकरराव आनंदराव उर्फ रावसाहेब पाटील (रा. बोरगाव) यांच्या पुढाकारातून उभा करण्यात आला होता. त्याचे अनावरणासाठी डॉ. राजेंद्र प्रसाद आले होते. १९३२ साली पुतळा अनावरणप्रसंगी डॉ. राजेंद्र प्रसाद
डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते झाले होते अनावरण