Headlines

नाशिकमध्ये 18 वर्षीय विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण:लग्नाचे आमिष दाखवून केले अत्याचार; नाशिकमधील संतापजनक प्रकार




नाशिकमधील उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोशल मीडियाद्वारे ओळख करून घेत, लग्नाचे आमिष दाखवून एका 18 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संशयित आरोपीने पीडितेचे शारीरिक शोषण करण्यासोबतच तिच्या जातीवरून तिला त्रास देत लग्नास नकार दिला असून, याप्रकरणी पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकरोड जवळील पिंपळगाव खांब (वडनेर रोड) परिसरात राहणाऱ्या एका 18 वर्षीय विद्यार्थिनीची ‘स्नॅपचॅट’ ॲपच्या माध्यमातून पाथर्डी फाटा येथील सह्याद्रीनगरमध्ये राहणाऱ्या संशयित स्वरूप अमोल संधान याच्याशी ओळख झाली होती. याच ओळखीचा गैरफायदा घेत संशयिताने पीडित तरुणीशी जवळीक वाढवली आणि प्रेमसंबंध प्रस्थापित करून तिला लग्नाचे खोटे आमिष दाखवले. पीडितेच्या तक्रारीनुसार, संशयित स्वरूप संधान याने डिसेंबर 2025 ते जून 2026 या कालावधीत तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि त्यानंतर जेव्हा तरुणीने लग्नाबाबत विचारणा केली, तेव्हा त्याने तिच्या जातीवरून तिला हीन वागणूक देत लग्न करण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. संशयित आरोपी फरार आपली फसवणूक तसेच मानसिक व शारीरिक छळ झाल्याचे लक्षात येताच पीडितेने उपनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली असून, घटनेच्या कालावधीत तिचे वय विचारात घेऊन पोलिसांनी या गुन्ह्यात ‘पोक्सो’ कायद्याची कलमेही लावली आहेत. सध्या या प्रकरणातील संशयित आरोपी फरार असल्याने पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत, तर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुमेध सोनोने करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *