![]()
येवदा येथे भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे सामूहिक श्रवण करण्यात आले. पंतप्रधानांच्या या लोकप्रिय कार्यक्रमाच्या सामूहिक प्रक्षेपणाची सोय अण्णाभाऊ साठे समाज मंदिर येथे करण्यात आली होती. या उपक्रमाला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी उपस्थित कार्यकर्ते आणि नागरिकांनी पंतप्रधानांनी मांडलेल्या विविध सामाजिक, राष्ट्रीय आणि विकासाभिमुख विषयांवरील विचार मनोभावे ऐकले. या कार्यक्रमाला भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे अमरावती ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष नकुल सोनटक्के, भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी ओमप्रकाश शर्मा, किसान मोर्चाचे उपाध्यक्ष चंदुभाऊ रघुवंशी, तालुका सरचिटणीस नितीनभाऊ बढे, दिलीप धर्माळे, प्रेमसागर आसरे, राजुभाऊ तायडे, शंकर शेळके, प्रकाश वाघमारे, दिलीप दवंडे, दिलीप भालेराव, गणेश सरकटे, कार्तिक सरकटे, शंकर खंडारे, हिम्मतराव तायडे, राजू भालेराव, अविनाश तायडे आणि सूरज शेळके उपस्थित होते. याशिवाय, भारतीय जनता पार्टीचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानण्यात आले.
Source link
येवदा येथे 'मन की बात'चे सामूहिक श्रवण:भाजपा अनुसूचित जाती मोर्चाने केले आयोजन