Headlines

आज वटपौर्णिमा, पूजेचा मुहूर्त 6 ‎तास, भद्रा काळातही नाही अडथळा‎:सकाळी 9: 12 ते 10: 52 तर दुपारी 3:52 ते 7:12 वाजेपर्यंत शुभमुहूर्त‎




पतीच्या दीर्घायुष्यासाठी महत्त्वाची मानली‎जाणारी वटसावित्री पौर्णिमा सोमवारी साजरी‎होणार आहे. यंदा पहाटे ३.०७ पासून दुपारी‎४.१७ वाजेपर्यंत भद्रा काळ आहे. तरी‎ज्योतिषशास्त्रानुसार पौर्णिमेला येणारा भद्रा‎दोष मानला जात नाही. हा काळ वर्ज्य नाही.‎त्यामुळे पूजेसाठी सकाळी तीन तास आणि‎सायंकाळी साडेतीन तास असा साडेसहा‎तासांचा विशेष पुण्यपर्वकाळ आहे.‎ हिंदू धर्मात वटवृक्षाला शिवस्वरूप मानून‎ब्रह्म, सावित्री आणि वटवृक्षाच्या पूजनाची‎प्राचीन परंपरा आहे. वटवृक्ष हा‎पर्यावरणाचा समतोल राखणारा,‎ऑक्सिजन देणारा वृक्ष आहे. वाढत्या‎शहरीकरणात मात्र वटवृक्षांची संख्या कमी‎झाली. त्यामुळे सत्यवान-सावित्रीची कथा‎श्रवण करून पूजेचे पूर्ण फळ प्राप्त होते,‎अशी भाविकांची श्रद्धा आहे. दिवसभर‎उपवास करावा. दुसऱ्या दिवशी सकाळी तो‎सोडतात.‎ पूजनविधी, मंत्रपठण : पूजनात सुपारीच्या गणपतीची‎स्थापना करावी. त्यानंतर सती मातेच्या फोटोचे किंवा वडाच्या‎मुळाजवळ पुरुष सुक्तासह अभिषेक करावा. वटवृक्षाला तिहेरी‎दोरा गुंडाळताना ‘अवैधव्यं च सौभाग्यं’ या मंत्राचे पठण करावे.‎वडाला पाणी अर्पण करताना विशिष्ट मंत्रांचा जप करावा.‎शेवटी आंब्याचा नैवेद्य दाखवून वडाला तीन प्रदक्षिणा‎घालाव्यात. सुवासिनींची ओटी भरावी.‎ असा आहे साडेसहा तासांचा मुहूर्त‎‎ सोमवारी पहाटे ३.७ ते ३० तारखेच्या पहाटे ५.२७‎मिनिटांपर्यंत पौर्णिमेचा काळ आहे. यातच पहाटे‎३.७ ते दुपारी ४.१७ मिनिटांपर्यंत भद्रा काळ‎सांगण्यात आला आहे. दरम्यान, पौर्णिमा‎असल्याने या दिवशी भ्रदा काळ पाळू नये, असे‎ज्योतिषाचार्य ऋषिकेश चौधरी यांनी सांगितले.‎सकाळी ९.१२ मिनिट ते सकाळी १०.५२‎मिनिटांपर्यंत शुभ, तर ३.५२ मिनिट ते संध्याकाळी‎७.१२ मिनिटांपर्यंत लाभ, अमृत मुहूर्त आहेत.‎ वडाची फांदी तोडून पूजन अमान्य‎
पर्यावरणाचे रक्षण करणे हेच खरे देवत्व आहे.‎वडाची फांदी तोडून त्याचे पूजन करणे हे शास्त्रात‎मान्य नाही. त्याला पर्याय म्हणून ब्रह्म-सावित्री-‎वटवृक्ष यांच्या फोटोचे पूजन करणे शास्त्रशुद्ध‎आणि पर्यावरणपूरक ठरेल.‎
अनंत पांडव गुरुजी, ज्योतिषाचार्य‎



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *