Headlines

शिऊर येथील जि.प. शाळेचा लवकरच होणार कायापालट:वॉटरप्रूफिंग, फरशी, किचन शेड, रंगरंगोटीचे होणार काम




शिऊर केंद्रांतर्गत येणाऱ्या धनगर वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीचा छताचा एक भाग पहिल्याच जोरदार पावसात कोसळल्याची खळबळजनक घटना घडली. सुदैवाने ही दुर्घटना शाळा सुटल्यानंतर बुधवारी घडल्याने मोठा अनर्थ टळला. याची तत्काळ दखल घेत शिऊर गटाचे जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील निकम यांनी शनिवारी प्रत्यक्ष शाळेला भेट देऊन पाहणी केली आणि स्वतःच्या खर्चातून संपूर्ण शाळा दुरुस्त करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. शाळेच्या दुरवस्थेबद्दल बोलताना उपस्थित पालकांनी आणि शाळा व्यवस्थापन समितीने संताप व्यक्त केला. छतातून पाणी गळत असल्याची माहिती संबंधित यंत्रणेला वारंवार देण्यात आली होती. ग्रामसभेतही हा मुद्दा मांडून ग्रामपंचायत अधिकारी सखाराम दिवटे यांना लेखी व तोंडी निवेदने दिली होती. मात्र, या तक्रारींकडे प्रशासनाने साफ दुर्लक्ष केल्यामुळेच अखेर ही दुर्घटना घडल्याची कैफियत पालकांनी संजय पाटील यांच्याकडे मांडली. याप्रसंगी वर्ग १ ली ते ५ वीच्या विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटपही करण्यात आले. यावेळी माजी उपसरपंच अर्जुन क्षीरसागर, माजी ग्रा. पं. सदस्य राजेंद्र जाधव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोरख काळे, मुख्याध्यापक शेख मुनीर, मच्छिंद्र पगार, तुकाराम पगार, भागीनाथ सुरासे, नंदू जाधव, भगवान गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. स्वखर्चातून धनगर वस्ती शाळेची करणार दुरूस्ती शाळेचे छत कोसळल्यायाच्या प्रकारावर दै. ‘दिव्य मराठी’ने शुक्रवारी वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत जि.प. सदस्य संजय पाटील निकम यांनी मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीला तात्काळ दुरुस्तीचे आदेश दिले. छताचे वॉटरप्रूफिंग, फरशी दुरुस्ती, स्वच्छतागृह, किचन शेडची डागडुजी आणि रंगरंगोटीचे काम स्वखर्चातून करण्याचा शब्द त्यांनी दिला. कामाला गती मिळण्यासाठी त्यांनी स्वत: १० हजार रुपये रोख ॲडव्हान्स म्हणून सुपूर्द केले व दर्जेदार काम करण्याच्या सूचना दिल्या. जि. प. सदस्य संजय पाटील यांनी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *