Headlines

मतदान गर्दीचे नियमन करेल रोबोट:डॉ. सोलापुरेंच्या संशोधनाला पेटंट, वाचा रोबोटची वैशिष्ट्ये




निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुलभ आणि डिजिटल करण्यासाठी लातूरमधील राज्यशास्त्राचे अभ्यासक व संशोधकांनी महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. लातूरचे लेखक व अभ्यासक डॉ. राजशेखर सोलापुरे आणि त्यांचे सहकारी डॉ. रवींद्र माळी, डॉ. वैभव सूर्यवंशी, डॉ. सचिन वेरुळकर आणि डॉ. शेखर आष्टीकर यांनी विकसित केलेल्या ‘स्वायत्त मतदार सहाय्य रोबोट’ला भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाने अधिकृत पेटंट मंजूर केले आहे. या कामात त्यांना डॉ. बालासाहेब किलचे यांचे सहकार्य लाभले. हा रोबोट प्रामुख्याने मतदान केंद्रांच्या परिसरात मतदारांची ओळख पडताळणी करण्यासाठी आणि गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. हा ‘स्वायत्त मतदार सहाय्य रोबोट’ बायोमेट्रिक ओळख पडताळणी आणि बहुभाषिक संवादात तरबेज आहे. . पारंपरिक निवडणूक प्रक्रियेतील मानवी मर्यादा आणि त्रुटी दूर करून गर्दीचे अचूक नियमन करण्यासाठी हे एक अत्यंत प्रभावी, सुरक्षित आणि वायरलेस तंत्रज्ञान ठरणार आहे. ^हा रोबोट निवडणुकीतील मानवी चुका टाळून प्रक्रिया अधिक सुलभ करेल, ज्यामुळे मतदारांचा राजकीय सहभाग वाढण्यास मोठी मदत होईल. हा रोबोट प्रामुख्याने मतदान केंद्रांच्या परिसरात मतदारांची ओळख पडताळणी सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. डॉ. राजशेखर सोलापुरे, अभ्यासक



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *