Headlines

केतन अग्रवाल हत्याकांड:बालीचा विचार साेडून सियाच्या डोक्यात शिजला केतनच्या घातपाताचा कट, 3जुलैपर्यंत सिया-चेतनला पोलिस कोठडी




लोहगड किल्ल्यावरील केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना सोमवारी वडगाव न्यायालयात लोणावळा ग्रामीण पोलिसांनी हजर केले. या वेळी पोलिसांनी आरोपींची ७ दिवसांची पोलिस कोठडी संपुष्टात आल्याने त्यांना पुन्हा ७ दिवस पोलिस कोठडी वाढवून देण्याची मागणी केली. न्यायालयाने यावर ३ जुलैपर्यंत आरोपींच्या कोठडीत वाढ केली आहे. केतन याचा घात करण्याचा ६ जून, १४ जून रोजीही शिजला. त्यानंतर १८ जून रोजी त्याला मारण्यात आले. इंडोनेशियामधील बाली येथे प्री-वेडिंग शूटसाठी जाताना सिया हिने केतनचा पासपोर्ट फाडून टाकल्यावरही तिच्या डोक्यात त्याच्या घातापाताचा कट होता का? असा देखील संशय निर्माण झाला आहे. न्यायालयात सुरुवातीला न्यायाधीशांनी आरोपींना पोलिसांबद्दल काही तक्रार आहे का? अशी विचारणा केली. त्यावर आरोपींनी काही तक्रार नसल्याचे स्पष्ट केले. सियाने न्यायालयात माझे वकील आशुतोष श्रीवास्तव नसून विपुल दुशिंग असल्याचे सांगितले. तपास अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज पवार आरोपींनी एकत्र भेटून खुनाचा कट रचला आहे. घटना घडल्यानंतर सिया हिच्याकडे केतनचा मोबाईल फोन आला होता तो तिने नंतर नातेवाईकांकडे दिलेला आहे. त्यामध्ये कोणता डेटा डिलीट केला आहे का? याबाबत तपासणी करणे आहे. आरोपींनी काही डिजिटल डेटा डिलीट केला असून तो पुन्हा प्राप्त करणे आहे. आरोपींनी गुन्हा केल्यानंतर त्याची कबुली दिली असून त्याबाबत त्यांच्याकडे तपास करणे आहे. सियाचे रिक्रिएशन झालेला असून त्यानुसार चेतन याकडे पडताळणी कराची असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी विविध ठिकाणी भेटले सरकारी वकील राजश्री विरकुड युक्तिवाद करताना सांगितले की, आरोपी गुन्हे करण्यापूर्वी विविध ठिकाणी भेटले आहे. गुन्हा करण्यापूर्वी त्यांनी मीटिंग केल्याचे पुरावे देखील सापडले आहेत. चेतनचे रिक्रिएशन करणे बाकी आहे. आरोपींना गुन्हा करण्यास आणखी कोणी मदत केली याबाबत तपास करायचा आहे. आतापर्यंत ७ दिवसात पोलिसांनी वेगवेगळ्या १३ गोष्टी जप्त केल्या आहेत. अटक चुकीची सियाचे वकील विपुल दुशिंग प्रतिवाद करताना म्हणाले, पोलिसांनी आरोपींना अटक करताना दिलेली कारणे चुकीची असून त्यांना अटक करणे बेकायदेशीर होते. कोणतीही अटक करण्यापूर्वी त्याबाबतचे पुरावे पोलिसांकडे असणे आवश्यक असते. सात दिवसाच्या पोलिस कोठडीदरम्यान पुरेसा तपास करण्यात आलेला असून आता अधिक कोठडीची गरज नाही. तपासात ‘फॉरेन्सिक गेट ॲनालिसिस’ सीसीटीव्ही फुटेजमध्ये गुन्हेगाराचा चेहरा अस्पष्ट किंवा मास्कमुळे झाकलेला असल्यास पोलिस फॉरेन्सिक गेट अॅनालिसिस चाचणीचा वापर करतात. प्रत्येक मानवी शरीराच्या चालण्याची ढब ही बोटांच्या ठशांप्रमाणेच अद्वितीय असते. या चाचणीत अत्याधुनिक एआय सॉफ्टवेअरद्वारे गुन्ह्याच्या वेळचे फुटेज व संशयिताच्या चालण्याच्या व्हिडिओची वैज्ञानिक तुलना केली जाते. यात पावलांतील अंतर, हाडांच्या हालचाली मोजतात. गुन्हा सिद्धतेसाठी हा एक अत्यंत मजबूत पूरक पुरावा मानला जातो.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *