Headlines

अक्कलकोटमध्ये चिमुरड्याच्या कानाचा डुकराने तोडला लचका:जंगी प्लॉटमधील थरारक घटना; डोक्यालाही घेतला चावा, 14 टाके पडले




येथील जंगी प्लॉटमध्ये सकाळी अकराच्या सुमारास एका दोन वर्षाच्या मुलावर मोकाट डुकराने थरारक हल्ला केला. त्याच्या डोक्याला व कानाला चावा घेतला. हा हल्ला इतका भीषण होता की, डुकाराने चिमुकल्याच्या कानाचा लचकाच तोडला. सार्थक काशिनाथ माळगे (वय 2 वर्षे )असे जखमी मुलाचे नाव आहे. सकाळी गेटमध्ये खेळत असलेल्या सार्थकवर उष्टे अन्न खाण्यास आलेल्या डुकराने झडप घातली. एक ज्येष्ठ महिला प्रसंगावधान राखून मदतीला धावल्याने मुलाचा जीव वाचला. त्या मोकाट डुकराने आजीलाही धडक देऊन जखमी केले. दरम्यान, पालकांनी मुलाला तातडीने ग्रामीण रुग्णालय येथे नेले. गंभीर जखमी झाल्याने लगेच खासगी रुग्णालयात दाखल केले. येथील डॉक्टरांनी सार्थकच्या डोक्याला 14 टाके घातले आहेत. रात्री उशिरापर्यंत उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. जीव वाचला. त्या मोकाट डुकराने आजीलाही धडक देऊन जखमी केले. दरम्यान, पालकांनी मुलाला तातडीने ग्रामीण रुग्णालय येथे नेले. गंभीर जखमी झाल्याने लगेच खासगी रुग्णालयात दाखल केले. येथील डॉक्टरांनी सार्थकच्या डोक्याला 14 टाके घातले आहेत. रात्री उशिरापर्यंत उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. मोकाट डुकरांचा कायमचा बंदोबस्त करायला हवा जखमी मुलाला 14 टाके घातले आहेत. मुलगा अजुन बेशुद्ध आहे. जखम खोलवर आहे. डुकरांच्या त्रासाबद्दल वारंवार नगरपालिकेकडे तक्रार केली आहे. मोकाट डुकरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त व्हावा. -काशिनाथ माळगे, जखमी सार्थकचे वडील कुर्डुवाडीमध्ये मोकाट जनावरांचा सुळसुळाट दुसरीकडे कुर्डुवाडी‎ शहरातील वाढती रहदारी पाहता प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण‎ करण्यात आले असले, तरी मोकाट जनावरांचा प्रश्न अजूनही ‎जैसे थेच आहे. पालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या‎ थातूरमातूर कारवाईनंतर ही मोकाट जनावरे पुन्हा रस्त्यावर ‎नाहीतर थेट रहिवाशांच्या वसाहतींमध्ये ठाण मांडून बसलेली‎ दिसून येत आहेत. दुसरीकडे, प्रशासन मात्र एखादी-दुसरी ‎जुजबी कारवाई करून आपलीच पाठ थोपटून घेण्याचे काम‎करत असल्याचा संतापजनक आरोप स्थानिक नागरिकांमधून ‎केला जात आहे.‎ मुले, महिला, वृद्धांना‎बाहेर पडणे मुश्कील‎ गावात मोकाट फिरणारी सगळी‎जनावरे आता माढा रोड व सातव ‎कॉलनी परिसरात आणून सोडली‎ जात आहेत. जत्थ्याने ही जनावरे ‎येत असल्याने मुले, महिला व‎वृद्धांना बाहेर पडणे मुश्कील झाले‎ आहे. प्रशासनाची पिंजरा गाडी ‎कुठे दिसत नाही. कारवाई थंड‎ झाली आहे तरी प्रशासनाने यावर‎ तात्काळ उपाययोजना करावी.‎ – हरी भराटे, नागरिक, कुर्डुवाडी‎ नगरपालिका कर्मचारी पकडायला धजत नाहीत‎ टीम तयार करतोय मागच्या टेंडरची फाईल घेऊन. नगरपालिका कर्मचारी‎पकडायला धजत नाहीत. लहान जनावरदेखील धरताना मारायला जाते.‎लवकरच मोहिम चालू करतो आहे.‎ डॉ. मोहसीन मकन, आरोग्य सभापती नगरपालिका, कुर्डुवाडी‎



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *