![]()
राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या टीईटी पेपरफुटी प्रकरणात पोलिस तपास आता अत्यंत वेगवान झाला असून या घोटाळ्याची पाळेमुळे थेट परराज्यांपर्यंत पोहोचली आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांचे ५ अधिकाऱ्यांचे विशेष पथक थेट उत्तर प्रदेशातील आग्रा येथील प्रिंटिंग प्रेसमध्ये दाखल झाले असून तिथे कसून चौकशी सुरू आहे. दुसरीकडे, आरोपींच्या शोधात बिहारमधील पाटणा येथे गेलेल्या पोलिस पथकाने एका महिलेला ताब्यात घेतले असल्याने या प्रकरणाला आता मोठे वळण मिळाले आहे. आग्र्याच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये CCTV आणि कर्मचाऱ्यांची झाडाझडती
टीईटी परीक्षेचे पेपर ज्या प्रेसमध्ये छापले गेले, तिथूनच हा गोपनीय डेटा लीक झाल्याचा संशय पोलिसांना आहे. आग्र्याच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये दाखल झालेल्या ५ अधिकाऱ्यांच्या पथकाने संपूर्ण प्रेसचा ताबा घेतला आहे. पाटण्यातून महिला ताब्यात; तपासात सहकार्य न केल्याने कारवाई
याच प्रकरणातील मुख्य आरोपींचा माग काढत पुणे पोलिसांचे एक पथक बिहारची राजधानी पाटणा येथे पोहोचले. तेथे छापेमारी दरम्यान पोलिसांनी एका संशयित महिलेला ताब्यात घेतले आहे. ही महिला तपासात पोलिसांना अजिबात सहकार्य करत नव्हती आणि माहिती लपवण्याचा प्रयत्न करत होती, त्यामुळे अखेर पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन तिची कसून चौकशी सुरू केली आहे. या महिलेच्या चौकशीतून पेपरफुटीच्या मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचणे पोलिसांना सोपे होणार आहे. संबंधित बातम्या वाचा.. पेपरफुटीवरून विरोधकांचे प्रश्न अन् सरकारची परीक्षा:टीईटी पेपरफुटीतील दोषींवर‘मकोका’ लावणार- दादा भुसे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०२६ च्या पेपरफुटी प्रकरणावरून सोमवारी राज्य विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ झाला. या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत केली. तसेच दोषींवर थेट ‘मकोका’अंतर्गत कारवाईसाठी कायद्यात आवश्यक बदल तपासण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. फेरपरीक्षेसाठी उमेदवारांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही, असेही भुसे यांनी स्पष्ट केले.सविस्तर वाचा टीईटी पेपरफुटीवरून काँग्रेस आक्रमक:शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या ताफ्याला दाखवले काळे झेंडे, राजीनाम्याची मागणी
राज्यात टीईटी (TET) परीक्षेचा पेपर फुटल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट असतानाच, आता या प्रकरणाचे थेट पडसाद रस्त्यावर उमटू लागले आहेत. टीईटी पेपरफुटीच्या निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांनी थेट शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत तो अडवण्याचा प्रयत्न केला. “भ्रष्ट सरकारचा निषेध असो”, “विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ थांबवा” अशा जोरदार घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. या आक्रमक आंदोलनामुळे मंत्र्यांच्या सुरक्षेची आणि पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. सविस्तर वाचा
Source link
TET पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई:पोलिसांचे पथक आग्र्याच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये दाखल; पाटण्यातून एका महिलेला घेतले ताब्यात