Headlines

भविष्यात मोदी-शहा एकमेकांनाच फोडतील:महायुती म्हणजे रामद्रोही अन् धर्मद्रोह्यांचा अड्डा, राज ठाकरेंचे म्हणणे योग्यच, हा तर देहविक्रीचा प्रकार- राऊत




राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकारणाचे सत्य सांगितले आहे. हा सर्व देहविक्रीचाच प्रकार आहे. उद्या शिंदे गटातील लोकं दुसरीकडे जायला कमी करणार नाहीत. तुम्हाला मुलांसारखे सांभाळले आणि तुम्ही लफडे करत तिकडे गेलात, असे म्हणत उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी फुटलेल्या खासदारांना टोला लगावला आहे. अहिर यांच्यावर उद्धव ठाकरेंनी विश्वास ठेवला तो गेल्यावर ठाकरेंना काय वाटले असेल. आता एक दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा एकमेकांना फोडण्याचे काम करतील. संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रातील राजकारणाला एक प्रतिष्ठा होती, विचार प्रवाह होता. यशंवतराव चव्हाण, वसंतराव नाईक, देसाई, वसंतदादा पाटील असोत की बाळासाहेब ठाकरे, लिमये, फर्नाडिस हे सर्व लोकं एकत्र येत देशाचा विचार करायचे असे आता दिसून येत नाही. सत्ताधाऱ्यांना पक्ष फोडण्याचेच काम उरले आहे पण कधी त्यांचे ऑपरेशन होईल सांगता येत नाही. यांचा सर्वांचा डीएनए तपासावा लागेल यांच्यात महाराष्ट्राचे रक्त आहे की भेसळ हे पहावे लागेल. म्हणून अहिरांना उपसभापतीपद संजय राऊत म्हणाले की, ऑपरेशन टायगर म्हणू नका हे सर्व लोकं कोल्हे आणि लांडगे आहेत. बेसावध ठेवत सत्तेचा वापर करत पक्ष फोडण्याचे काम जे सुरू आहे त्यामध्ये काही मोठी गोष्ट नाही. राज ठाकरे यांनी फुटलेल्या खासदारांवर जी टीका केली आहे ती अत्यंत योग्य आहे. माल विकायला तयार आहे म्हणून कोणी तरी घेणारच. सचिन अहिर आमच्यासोबत राहून फडणवीस, शिंदेंचे काम करत होते. आमचे जे खासदार फोडले त्यामध्ये अहिर यांचा हात होता म्हणून बक्षीस म्हणून त्यांना उपसभापतीपद दिले आहे. ऑपरेशन तुतारीवर मी काय बोलू? संजय राऊत म्हणाले की, ऑपरेशन टायगर,ऑपरेशन तुतारी आणि एकदिवस ऑपरेशन कमळसुद्धा होईल, ते सुद्धा आप-आपसामध्ये होईल. भाजपने देशाचे राजकारण इतक्या खालच्या पातळीवर नेऊन ठेवले आहे की भविष्यामध्ये असे सांगावे लागेल की या देशात केव्हातरी लोकशाही होती. ऑपरेशन तुतारीवर मी काय बोलू. अमोल कोल्हे यांनी जर काही विधान केले असेल तर दुर्दैव आहे. मी त्यांना ओळखतो ते छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका करतात. सध्या महात्मा फुलेंच्या भूमिकेत काम करत आहे. छत्रपती संभाजी महाराज आणि महात्मा फुले हे स्वाभिमानी आणि धर्मांभिमानी होते. त्यांच्या भूमिकेत शिरणारी व्यक्ती धर्म आणि विचार यांच्याशी द्रोह करणार नाही, याची मला खात्री वाटते. महायुतीमध्ये धर्मद्रोही-रामद्रोही लोकं संजय राऊत म्हणाले की, महायुतीमध्ये धर्मद्रोही आणि रामद्रोही लोकं आहेत. राम मंदिराच्या दान पेट्या लुटणाऱ्यांच्या पक्षात कोणी जाणार आहे का? किंवा बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची द्रोह करणाऱ्या शिंदे गटात कोणी जाणार आहे का? हिंदू द्रोही अन् राम द्रोही हे सर्व जण एकत्र आहेत. त्यांच्यामध्ये जाण्याचा विचार कोणी करत असेल तर त्यांना इतिहास, राम द्रोही, धर्म द्रोही म्हणून त्यांची गणना करेल. कोल्हे हे शिवसेनेसोबत होते तेव्हा त्यांनी निष्ठेने काम केले. त्यानंतर ते शरद पवार यांच्यासोबत गेले तिथे काम करत आहेत. कोल्हे यांना निवडून आणण्यामागे हजारो शिवसैनिकांची मेहनत आहे. तो मतदारसंघच शिवसेनचा आहे. अमोल कोल्हे छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारता म्हणून आम्ही सर्वांनी त्यांचे काम केले. त्यांनी काही वक्तव्य केले असले तरी ते मविआतच राहतील असे मला वाटते. त्या मतदारसंघात आमचा साधा शिवसैनिक सुद्धा जिंकू शकतो. हे ही वृत्त वाचा ‘ऑपरेशन टायगरचाच भाग म्हणजे ऑपरेशन वरळी’:उदय सामंतांचा मोठा दावा; म्हणाले- केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेला अधिक प्रतिनिधित्व मिळाल्यास आनंदच होईल
शिवसेनेचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर जोरदार टीका करत, सचिन अहिर यांच्या प्रवेशानंतर आता “ऑपरेशन वरळी” सुरू झाल्याचा दावा केला. शिवसेना (शिंदे गट) अधिक मजबूत होत असून, मुंबईसह राज्यभरातून नेत्यांचा पक्षप्रवेश सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *