Headlines

संभाजीनगरातून ‘आयएसआय’च्या हेरांना चार वर्षांपासून रसद पुरवणारा गजाआड:राजस्थान सीआयडी पथकाकडून हर्सूलमध्ये आरोपी रफिक चांदला अटक




पाकिस्तानी गुप्तहेर संघटना असलेल्या आयएसआयला माहिती पुरवणाऱ्या गुप्तहेरांना पैशांची रसद पुरवणाऱ्या एका एजंटला राजस्थान पोलिसांच्या सीआयडी पथकाने छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली आहे. रफिक चांद शेख (वय ४१, रा. सईदा कॉलनी, हर्सूल) असे या आरोपीचे नाव असून, त्याला ३० जून रोजी ताब्यात घेण्यात आले. तो गेल्या ४ वर्षांपासून या देशविघातक कृत्यात सक्रिय होता. या नेटवर्कशी जोडलेल्या इतर संशयितांचाही कसून शोध घेतला जात आहे. राजस्थान सीआयडीचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (इंटेलिजन्स) प्रफुल्ल कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी महिन्यात जैसलमेर येथील झबरा राम आणि आसामच्या दिब्रुगड हवाई दल स्थानकावर एमटीएस पदावर कार्यरत असलेल्या सुमित कुमार या दोघांना हेरगिरीच्या आरोपाखाली अटक केली होती. त्यांच्या तपासात रफिकचे नाव समोर आल्याने त्याला आधी नोटीस बजावली होती. चौकशीदरम्यान त्याच्या आर्थिक व्यवहारांत संशयास्पद बाबी उघडकीस आल्याने त्याला बेड्या ठोकल्या. रफिकने यापूर्वी शहरातील विविध मॉल्समध्ये काम केले होते. मात्र, फंडिंगच्या कामात मोठी टक्केवारी मिळत असल्याने त्याने ती नोकरी सोडली होती. विशेष म्हणजे, वर्षभरापूर्वीच त्याचे लग्न झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. प्रकरण काय ? ई-मित्र केंद्र चालवत झबरा रामने पाठवली होती लष्कराची माहिती जैसलमेरमधील पोखरण येथे ई-मित्र केंद्र चालवणारा झबरा राम हा या साखळीतील महत्त्वाचा दुवा होता. त्याने पैशांच्या आमिषाने स्वतःच्या मोबाईल क्रमांकाचा ओटीपी पाकिस्तानी आयएसआय एजंटला दिला होता. त्या आधारे पाकिस्तानी हस्तक त्याचे व्हॉट्सॲप परदेशातून वापरत होते व लष्कराची गोपनीय माहिती मिळवत होते. झबरा रामच्या बँक खात्यात येणाऱ्या पैशांचा सीआयडीने तांत्रिक माग काढला, तेव्हा हे सर्व धागेदोरे थेट छत्रपती संभाजीनगरच्या रफिकपर्यंत पोहोचले. डमी बँक खात्यांचा वापर, परदेशातून पैसा जमा, सोशल मीडियाचे जाळे रफिक शेख हा सोशल मीडियाच्या माध्यमातून आयएसआयच्या एका हँडलरच्या संपर्कात आला होता. पाकिस्तानी हँडलरच्या सांगण्यावरून त्याने स्वतःच्या नावाव्यतिरिक्त इतर लोकांच्या नावानेही वेगवेगळी बँक खाती उघडली होती. याच खात्यांमध्ये परदेशातून पैसे जमा व्हायचे आणि तेथून ते भारतातील हेरांपर्यंत पोहोचवले जायचे. अटकेतील झबरा राम व सुमित कुमार यांना रफिकनेच पैसे पाठवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *