Headlines

टिप्पणी:नागरिकांना सरकारचे गुलाम बनवले जात आहे, विरोध केल्यास गुन्हे- मुंबई हायकोर्ट




मुंबई हायकोर्टाने गुरुवारी मुंबई पोलिसांना खडे बोल सुनावले. न्यायमूर्ती माधव जामदार यांनी तोंडी टिप्पणी केली. ते म्हणाले- ‘सर्व नागरिकांना भारत सरकारचे गुलाम बनवले जात आहे. ते विरोध करू शकत नाहीत, ते आंदोलन करू शकत नाहीत- हे सर्व काय आहे? आता इतके पेपर लीक झाले की लोकांनी विरोध केला, तर तुम्ही गुन्हे दाखल कराल… हे काय आहे? विरोध करणे नागरिकांचा हक्क आहे… याचिकाकर्त्याने केवळ ‘भाजप सरकार मुर्दाबाद’ अशा घोषणा दिल्या आहेत… नागरिक अशा घोषणा का देऊ शकत नाहीत? घोषणांसाठी तडीपारीचा आदेश का?’ पोलिसांनी ‘सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’चे सरचिटणीस सईद अहमद अब्दुल वाहिद चौधरी (४९) यांच्याविरुद्ध तडीपारीचा आदेश दिला. सईद केंद्राच्या निर्णयांच्या विरोधात आंदोलन करतात. न्यायमूर्ती जामदार म्हणाले- महाराष्ट्रात घोडेबाजार सुरू आहे, पक्ष बदलून घ्या न्यायमूर्ती माधव जामदार म्हणाले- ‘परवा एका १० वर्षांच्या मुलाचा अपघातात मृत्यू झाला व राज्य विधानसभा यावर चर्चा करत होती की पीठासीन अधिकारी कसा निवडला जातो आणि तो एका पक्षातून दुसऱ्या पक्षात कसा गेला… हे काय आहे? अगदी तुम्हालाही (सईद अहमद) पक्ष बदलून बघा… संपूर्ण महाराष्ट्रात घोडेबाजार सुरू आहे. तुमच्यावर काही एफआयआर आहेत… पक्ष बदलण्याचा विचार करा. तिथे एक वॉशिंग मशीन आहे.’



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *