राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) देशातील १० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्येच्या ४६ शहरांमध्ये मिलियन प्लस सर्वेक्षण केले आहे. याचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला. यात सर्वाधिक १० शहरे महाराष्ट्राची आहेत. संभाजीनगरला बेरोजगारीचा विळखा अधिक आहे.
.
मात्र नागपूर व ठाण्याच्या तुलनेत संभाजीनगरच्या नोकरदारांना वेतन अधिक आहे. विशेष म्हणजे, नवी मुंबईच्या नोकरदारांना सर्वाधिक ५१,५१५ रुपयांचे वेतन आहे. मुंबई दुसऱ्या तर पिंपरी चिंचवडचा क्रमांक तिसरा आहे.
संभाजीनगरात ७५% रोजगार सेवा क्षेत्रामध्ये संभाजीनगरात ७४.४% रोजगार हा सेवा क्षेत्रावर अवलंबून आहे. त्यामध्ये आयटी, पर्यटन, हॉटेलिंग आणि किरकोळ व्यवसाय आहे. सेवा क्षेत्रातील नोकऱ्या अनेकदा तात्पुरत्या किंवा कंत्राटी स्वरूपाच्या असल्याने बेरोजगारीचा आलेख वाढता राहतो.
संभाजीनगरमध्ये २५% रोजगार उत्पादन क्षेत्रात छत्रपती संभाजीनगरमध्ये मॅन्युफॅक्चरिंग, उत्पादन, वीज आणि बांधकाम करणाऱ्यांचे प्रमाण अवघे २५.१% आहे. यावरून स्पष्ट होते की, संभाजीनगरमध्ये मोठ्या आणि मध्यम उद्योगांमधून निर्माण होणाऱ्या शाश्वत रोजगाराची कमतरता दिसून आली आहे.

संभाजीनगर रोजगारात मागे संभाजीनगरमध्ये बेरोजगारी जास्त असली तरी, नियमित नोकरी करणाऱ्यांचा मासिक पगार नाशिकच्या तुलनेत अधिक आहे. संभाजीनगरचे सरासरी मासिक उत्पन्न २९,५११ रुपये आहे, तर नाशिकमध्ये हे उत्पन्न २४,७२१ रुपये आहे. म्हणजेच नाशिकच्या तुलनेत संभाजीनगरमध्ये सरासरी मासिक वेतन ४,७९० रुपयांनी अधिक आहे. स्वयंरोजगार करणाऱ्यांच्या बाबतीत मात्र नाशिक पुढे आहे. नाशिकला स्वयंरोजगार करणाऱ्यांचे मासिक उत्पन्न २६,१८८ रुपये आहे. संभाजीनगरच्या व्यावसायिकाचे उत्पन्न २०,०१२ रुपये आहे.
संभाजीनगरमध्ये ठाणे, नागपूरपेक्षा पगार जास्त
छत्रपती संभाजीनगरात बेरोजगारीचा दर ७.८% आहे. नाशिकमध्ये हा दर केवळ २.६% आहे. प्रत्यक्ष रोजगारातही ४९.४ टक्यांसह नाशिक सरस आहे. संभाजीनगरमध्ये केवळ ४२.०% लोकांनाच प्रत्यक्ष रोजगार मिळालेला आहे.