Headlines

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघावर भाजपचा दावा:खासदार धनंजय महाडिकांची माहिती; गोकुळची निवडणूकही महायुती एकत्रितपणे लढवणार




गेल्या निवडणुकीत पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला होता. परंतु आता राष्ट्रवादीचे लाड यांचे संपूर्ण कुटुंबच भाजपमध्ये सामील झाले आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना, या दृष्टिकोनातून त्या जागेवर भारतीय जनता पार्टीचा क्लेम आहे, असा दावा खासदार धनंजय महाडिक यांनी केला आहे. तसेच, येणाऱ्या निवडणुकीत पुणे शिक्षक आणि पुणे पदवीधर या दोन्ही जागा भाजपच लढवणार असल्याचेही महाडिक यांनी स्पष्ट केले आहे. धनंजय महाडिक म्हणाले, शिक्षक मतदारसंघावर भाजप विरुद्ध काँग्रेस अशी निवडणूक झाली होती. काँग्रेस जरी विजय झाली असली, तरी यावेळी आम्ही भारतीय जनता पार्टी शिक्षक असेल आणि पुणे पदवीधर असेल दोन्ही जागा भारतीय जनता पार्टी म्हणून लढवण्याचा आमच्या वरिष्ठांचा निर्णय आहे. गोकुळ निवडणुकीच्या संदर्भात बोलताना धनंजय महाडिक म्हणाले, महायुती म्हणून या निवडणुकीला सामोरे जायचे आहे, अशा सूचना वरिष्ठांकडून आम्हाला आहेत. आम्ही त्या पद्धतीने जिल्हा पातळीवर सगळ्यांनी एकदिलाने एकजुटीने एकत्र सगळे ठराव गोळा केले आहेत. भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना आणि जनसुराज्य यांचे किती किती ठराव आहेत, प्रत्येकाच्या संस्था किती आहेत त्याची शहानिशा करा आणि त्यानुसार जागेचे वाटप होईल, अशा दृष्टिकोनातून बैठक झाल्याची माहिती महाडिक यांनी दिली आहे. मुख्यमंत्री निर्णय सांगणार आहेत पुढे बोलताना धनंजय महाडिक म्हणाले, मुश्रीफांनी त्यांच्या ठरावाच्या संख्येनुसार त्यांना दहा जागा मिळाव्यात अशी मागणी केली आहे. आमच्या ठरावाच्या संख्येनुसार आठ जागांची मागणी केली आहे. शिवसेनेच्या ठरावाच्या संख्येनुसार त्यांनी आठ जागेची मागणी केली आहे आणि जनसुराज्य कोरे साहेबांनी तीन जागेची मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही मुख्यमंत्री महोदयांकडे वर्षा बंगल्यावर आम्ही भेट घेतली आहे, प्रत्येकाने आपली भूमिका मांडलेली आहे. असे त्यांनी सांगितले. प्रत्येक पक्षाला आपल्याला थोडासा अधिकचा वाटा मिळावा ही अपेक्षा आहे आणि म्हणून या सगळ्यांच्या भूमिका ऐकून घेतल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांनी दोन-तीन दिवसांमध्ये यावरती मी निर्णय घेतो आणि कळवतो असं सांगितलं आहे. त्यावेळी महाविकास आघाडी झाली होती, आता महायुती होईल मुख्यमंत्री हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्री हे आमच्या चारही पक्षांचे प्रमुख आहेत आणि ते सांगतील तो आदेश सगळे जण आम्ही मान्य करू. ज्या जागा देतील त्या जागा घेण्यासाठी साहेबांचा निर्णय अंतिम असेल. गोकुळमध्ये एक दिलाने एकत्रित ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यावेळी महाडिक साहेबांची व पी. एन. साहेबांची सत्ता होती, जवळजवळ 25 वर्ष त्यांची सत्ता होती, त्यावेळी पक्षीय पातळीवर कधी निवडणुका लढवल्या गेल्या नव्हत्या, गट असायचे. गेल्या पंचवार्षिकला राज्यामध्ये ज्यावेळी महाविकास आघाडी सरकार होतं, त्यावेळी उद्धव साहेबांनी या सगळ्या नेतेमंडळींना मुंबईला बोलवून महाविकास आघाडीचे पॅनल झालं होतं. तेव्हापासून पक्षीय चित्र आलं आहे; त्यावेळी महाविकास आघाडी झाली होती, आता महायुती होईल, असे महाडिक म्हणाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *