Headlines

Rohit Pawar MPSC Protest Pune; BJP MLA Counter Attack Statement



राज्यातील सध्याची राजकीय आणि सामाजिक स्थिती पाहता आजचा दिवस विविध आंदोलनांनी गाजत आहे. एका बाजूला मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर ‘कॉकरोच जनता पार्टी’चे नेते अभिजीत दिपके यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन

.

पुण्यातील एस. एम. जोशी सभागृहाजवळील गरवारे पुलावर काल रात्रीपासून विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांनी सहभागी होत विद्यार्थ्यांना जाहीर पाठिंबा दिला. MPSC आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी त्वरित राजीनामा द्यावा, अशी आंदोलकांची प्रमुख मागणी असून राजीनामा मिळेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. ‘इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही आयोगाच्या अध्यक्षांवर कारवाई का होत नाही?’ असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला असून, विद्यार्थ्यांना अभ्यासाऐवजी रस्त्यावर का उतरावे लागतेय, यावर चिंता व्यक्त केली आहे.

भाजपकडून रोहित पवारांवर सडकून टीका

भाजपचे आमदार राजेंद्र राऊत यांनी रोहित पवारांच्या या सहभागावर कडाडून टीका केली आहे. रोहित पवार हे ‘बाळुत्यात शहाणं झालेलं लेकरू’ असल्याची बोचरी टीका करत, उठसूठ कोणत्याही विषयावर आंदोलन करून केवळ प्रसिद्धीचा स्टंट करण्याची त्यांना सवय लागली असल्याचा टोला राऊत यांनी लगावला आहे.

हे आंदोलन केवळ राजकीय हेतूने- पाचपुते

भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनीही रोहित पवारांच्या या आंदोलनाला केवळ ‘राजकीय फार्स’ म्हटले आहे. 30 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी MPSC विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या होत्या. त्यानुसार, राज्य सरकारने तातडीने पावले उचलत कालच MPSC चे सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली केली आहे. सरकारच्या पातळीवर विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण होत असताना, हे आंदोलन केवळ राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप आमदार पाचपुते यांनी केला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *