![]()
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त १ जुलै रोजी जामठी येथे कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे उद्यानविद्या शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर अल निनोच्या परिणामांविषयी सविस्तर माहिती दिली. कमी कालावधीत येणाऱ्या पिकांची निवड, तसेच फळबाग लागवडीबाबत त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी भारत कासार यांनी पोखरा योजनेची माहिती दिली. पंचायत समितीचे कृषी अधिकारी संतोष भालेराव यांनी प्रास्ताविक केले. स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या कृषी विकासातील योगदानाबद्दल त्यांनी माहिती दिली. अरुण सोहनी यांनी जैविक शेतीचे महत्त्व सांगितले. त्याचे फायदे मांडले. आधुनिक शेतीमध्ये जैविक पद्धतींचा वापर याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच पशुसंवर्धन विभागाचे पशुधन पर्यवेक्षक योगेश पाटील यांनी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती उपस्थित शेतकऱ्यांना दिली. या कार्यक्रमास पंचायत समितीचे सभापती उत्तम चव्हाण, गटविकास अधिकारी अमोल जगताप, रामेश्वर घोंगडे, उपकृषी अधिकारी अतुल पाटील, सहायक कृषी अधिकारी योगेश पवार, उपसरपंच रमेश जाधव, आदींची उपस्थिती होती.
Source link
जामठीत वसंतराव नाईक जयंतीनिमित्त अभिवादन:कृषी दिनानिमित मान्यवरांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन