![]()
बदलत्या हवामानामुळे शेतीपुढील आव्हाने दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यावर मात करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, जलसंधारण, पीक नियोजन, हवामानाशी सुसंगत शेतीपद्धतीचा अवलंब करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन पंचायत समितीच्या सभापती वैशाली बोंबले यांनी केले. त्या माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त पंचायत समिती सभागृहात आयोजित कृषी दिन कार्यक्रमात बोलत होत्या. या वेळी उपसभापती संजय लघाने, पंचायत समिती सदस्य दादासाहेब गलांडे, प्रदीप नरके, प्रमोद पन्हाळकर, मनोज गायके, सखुबाई झारगड, प्रियंका भुजंग, भाऊसाहेब गोजरे, गटविकास अधिकारी मनोरमा गायकवाड, प्रशासन अधिकारी राजेश कांबळे, कृषी अधिकारी संतोष जाधव, विस्तार अधिकारी अयोध्या जाधव, नागेश निलावाड, शैलेश सरसमकर, मंडळ कृषी अधिकारी यशवंत चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. सभापती बोंबले यांनी सांगितले की, आधुनिक शेती पद्धती, पीक नियोजन, मृदा व जलसंधारण, सेंद्रिय शेती तसेच शासनाच्या विविध कृषी योजनांची माहिती प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन यांसारख्या व्यवसायांचे महत्त्व समजावून सांगितले पाहिजे. तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेतले पाहिजे. यासाठी शासकीय कृषी अधिकारी यांच्याकडूनही शेतकऱ्यांनी मार्गदर्शन घेतले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. या वेळी तालुक्यातील शेतकरी, कृषी सहायक उपस्थित होते.
Source link
शेतकरी बांधवांनी शेती आधुनिक पद्धतीने करावी- सभापती बोंबले:पुढील वर्षांपासून 10 शेतकऱ्यांचा पंचायत समितीतर्फे गौरव