![]()
महाराष्ट्र सरकारने देशी गोवंशाचे महत्त्व ओळखून गायीला ‘राज्यमाता’ हा सर्वोच्च दर्जा बहाल केला आहे. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आणि राज्यभरातील देशी गोवंशाचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी ‘महाराष्ट्र गोसेवा आयोग’ कार्यरत आहे. सद्यःस्थितीत आयोगाकडे राज्यभरातील ९८६ गोशाळांची नोंदणी झाली असून, देशी गोवंशाच्या माध्यमातून एक नवी आर्थिक व वैज्ञानिक क्रांती घडवण्याचा संकल्प आयोगाने केला आहे. अकोल्यात राणी सती धाम येथून शोभायात्रा काढण्यात आली. रथात सजवलेल्या गोमातेला विराजमान करून माहेश्वरी भवनापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. यात महिला भगिनी, दिंडी व गोसेवक सहभागी झाले. शोभायात्रेचे नगरसेविका उषा विरक तथा माहेश्वरी भवन येथे माहेश्वरी समाज ट्रस्टचे अध्यक्ष विजय तोष्णीवाल, विजय राठी, नरेश बियाणी, विनीत बियाणी, शांतीलाल भाला, राजेश लोहिया, प्रा. डॉ. रमण हेडा आदींनी स्वागत केले. मान्यवरांचे स्वागत आदर्श गोसेवा व अनुसंधान प्रकल्प अध्यक्ष सुभाष जैन, कानशिवनी गोरक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश वाघमारे, गोरक्षण संस्थेचे विजय जानी, रवी चांडक, परमानंद मोटवानी, कैलास अग्रवाल, आनंद गोयनका, आदित्य अग्रवाल आदींनी केले. गोसेवा आयोगाच्या या अभियानात अकोला जिल्हा अग्रक्रमी राहिला आहे. जिल्ह्यात ३६ गोशाळांची नोंदणी आयोगाकडे झाली आहे. विशेष म्हणजे, यातील २४ गोशाळांना गोवंश रक्षण आणि संवर्धनासाठी शासनाकडून नियमित अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे. या अनुदानामुळे गोशाळांना चारा, औषधोपचार आणि जनावरांची निगा राखणे सोपे झाले असून, अनेक बेवारस आणि कत्तलखान्याकडे जाणाऱ्या गोवंशाचे प्राण वाचवण्यात या संस्थांना यश आले आहे. पुणे येथून १२ जूनला सुरू झालेली ही गोसेवा यात्रा ५ जुलैला नागपूरला पोहोचणार असून तेथे समारोप होणार आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात यात्रेला उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, असे सांगितले. बुधवारी शहरातील न्यू राधाकिसन प्लॉट परिसरातील माहेश्वरी भवनात संपन्न राज्यमाता गोमाता संवाद यात्रा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून मुंदडा बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनय नावंदर, ज्ञानेश्वर महाराज वाघ, विहिंपचे राष्ट्रीय सहमंत्री शंकर गायकर, सनतकुमार गुप्ता, आदर्श गोसेवा अनुसंधान प्रकल्पाचे सचिव प्रा. विवेक बिडवई, प्रांत गोरक्षा प्रमुख अतुल आयचित, गोसेवा आयोगाचे सदस्य उद्धव नेरकर, सुनील सूर्यवंशी, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. नरेंद्र अरबट, पशुसंवर्धन अधिकारी आशिष पवार, एनजीओ फेडरेशनचे मुकुंद अण्णा शिंदे, माहेश्वरी समाज ट्रस्टचे उपाध्यक्ष शांतीलाल भाला आदी उपस्थित होते. पशुधन विकणाऱ्या शेतकऱ्यांकडून आतापर्यंत आयोगाने ५६६० गोवंश विकत घेऊन ते संवर्धनासाठी अन्य गोशाळांना दिले आहे. राज्यात सन २०२० मध्ये एक कोटी ३५ लाख गोवंश होते. आज त्यात २० लाख गोवंशाची कपात झाली. यातून देशी गोवंश कमी झाले आहेत. आयोग गोमातेशिवाय बैल व गोऱ्हे यांना अनुदान सुरू करण्याच्या प्रयत्नात आहे. गो-आधारित शेतीवर भर केवळ गोशाळा चालवणे हा आयोगाचा उद्देश नसून, गोवंशाच्या माध्यमातून शेतीला शाश्वत बनवणे हा मुख्य हेतू आहे. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत खालावत चालला आहे. अशा वेळी देशी गायीचे शेण आणि गोमूत्र हे शेतीसाठी ‘अमृत’ ठरत आहेत. आयोगामार्फत गो-आधारित नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन दिले जात आहे. याशिवाय, गो-उत्पादनांच्या निर्मितीवरही मोठा भर दिला जात आहे. गायीच्या दुधाव्यतिरिक्त शेण आणि गोमूत्रापासून धूपकाठी, साबण, विविध औषधे आणि खतांची निर्मिती करून ग्रामीण भागात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या जात असल्याचे सांगण्यात आले.
Source link
ग्रामीण अर्थव्यवस्थेला झळाळी देण्याचा गोसेवा आयोगाचा संकल्प:अकोल्यात 36 गोशाळांची नोंदणी; 24 संस्थांना शासन अनुदान