Headlines

हरितक्रांती, रोहयोचे जनक वसंतराव नाईक यांचे राष्ट्रनिर्मितीत योगदान:कृषी महाविद्यालयातील कार्यक्रमात प्रा. विलास भवरे यांचे प्रतिपादन‎



राज्याच्या, आणि पर्यायाने देशाच्या विकासात, हरितक्रांती, पंचायत राज, श्वेतक्रांती, आणि रोजगार हमी यांसारख्या शाश्वत ग्रामविकासाच्या योजना प्रभावीपणे राबवणाऱ्या स्व. वसंतराव नाईक यांचे राष्ट्रनिर्मितीत अतुलनीय योगदान आहे. त्यांनी शेतकरी, आणि शेतकऱ्यां

.

व्यासपीठावर अधिष्ठाता कृषी डॉ. देवानंद पंचभाई, संचालक संशोधन डॉ. शामसुंदर माने, संचालक विस्तार शिक्षण डॉ. धनराज उंदीरवाडे, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. सुरेंद्र काळबांडे, व अधिष्ठाता उद्यानविद्या डॉ. अरविंद सोनकांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रा. विलास भवरे यांनी वसंतराव नाईक यांच्या जीवनकार्याचा वेध घेतला. आजची समृद्ध गावखेडी ही त्यांच्याच दूरदृष्टीची देण असल्याचे त्यांनी सांगितले.

वृक्षलागवडीतून निसर्ग संवर्धन: कुलगुरू डॉ. शरद गडाख म्हणाले की, वसंतराव नाईक यांच्या स्वप्नातील शाश्वत शेती कृतीत उतरवण्यासाठी विद्यापीठाने संपूर्ण विदर्भात ‘मॉडेल व्हिलेज’ आणि ‘शेतकरी शास्त्रज्ञ मंच’ ही अभिनव संकल्पना राबवून एक नवा आदर्श घालून दिला आहे. तसेच वाढता उन्हाळा आणि मान्सूनची अनिश्चितता पाहता प्रत्येकाने वृक्षलागवड व निसर्ग संवर्धनाची जबाबदारी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. प्रा. संजीवकुमार सलामे यांनी सूत्रसंचालन करुन आभार केले.

शेतकरी- शास्त्रज्ञ मंच, दर महिन्याचा चर्चासत्र कृषी विद्यापीठाच्या शेतकरी- शास्त्रज्ञ मंचाच्या वतीने दर महिन्याला पीकनिहाय शेतकरी आणि शास्त्रज्ञांचे थेट शेतावर चर्चासत्र आयोजित केली जात आहेत. विदर्भातील गावांचा शाश्वत विकास करण्यासाठी अकोला कृषी विद्यापीठाने ‘मॉडेल व्हिलेज’ संकल्पना कृतीत आणली आहे. अधिकाधिक शेतकरी बांधवांनी या मंचाचे सदस्य होऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *