![]()
संत नामदेव महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या नर्सी नामदेव येथून संत नामदेव महाराजांचा पायी पालखी सोहळा रविवारी ता. 5 पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. या पालखी सोहळ्यात शेकडो वारकरी सहभागी होणार असून पाच ठिकाणी पालखीचे रिंगण सोहळे होणार आहेत. नर्सी नामदेव येथून मागील 30 वर्षापासून नर्सी नामदेव ते पंढरपूर पायी पालखी सोहळा काढला जातो. यावर्षीही रविवारी मवारी ता. 5 पालखी सोहळा नर्सी येथून निघणार आहे. रविवारी गावातून प्रदक्षिणा घेतल्यानंतर पालखी सोहळा गावातच मुक्कानी थांबणार आहे. त्यानंतर सोमवारी ता. 6 पालखी सोहळा नर्सी येथून प्रस्थान करणार असून हिंगोली येथे दुपारी पालखी सोहळ्याचे भव्य स्वागत होईल. त्यानंतर रामलिला मैदानावर पहिले रिंगण पार पडणार आहे. या पालखी सोहळ्यात शेकडो वारकरी सहभागी होणार असून पंढरपूरपर्यंत ठिकठिकाणी दुपारचे व सायंकाळच्या भोजनाची व्यवस्था दानशूरांकडून करण्यात आली आहे. पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यासाठी नागरीकांकडून तयारी पूर्ण करण्यात आली आहे. या पालखी सोहळ्याचे पाच ठिकाणी रिंगण सोहळे होणार आहे. दिंडी चालक प्रमुख म्हणून बळीराम सोळंके काम पाहणार आहेत. या पालखी सोहळ्यात किर्तनकार, गुणीजन मंडळी, मृतदंगाचार्य सोबत असणार आहे. या पालखी सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन आमदार तान्हाजी मुटकुळे, संस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार श्रीकांत भुजबळ, उपाध्यक्ष भिकाजी किर्तनकार, सचिव द्वारकादास सारडा, विश्वस्त तथा माजी आमदार गजानन घुगे, भाऊराव पाटील गोरेगावकर, मनोज आखरे, आंबादास गाडे, सुभाष हुले, भिकुलाल बाहेती, ब्रिजगोपाल तोष्णीवाल, संजय देशमुख, रमेश मगर, राहुल नाईक, भागवत सोळंके यांनी केले आहे. या पाच ठिकाणी रंगणार रिंगण सोहळा या पालखी सोहळ्याचे पहिले रिंगण सोमवारीता. 6 हिंगोली येथे होणार आहे. त्यानंतर ता. 12 जुलै सकाळी 9 वाजता दैठणा, ता. 14 जुलै दुपारी चार वाजता परळी वैजनाथ, ता. 15 जूलै दुपारी चार वाजता अंबाजोगाई, ता. 17 जुलै सकाळी 10 वाजता जवळबन येथे होणार आहे. पालखी सोहळ्याचा असा असेल मुक्काम पालखी सोहळा ता. 6 जुलै हिंगोली, ता. 7 जुलै औंढा नागनाथ, ता. 8 जुलै बाराशिव, ता. 9 जुलै हट्टा, ता. 10 जुलै परभणी, ता. 11 जुलै पोखर्णी, ता. 12 जुलै गंगाखेड, ता. 13 जुलै उक्कडगाव, ता. 14जुलै परळी वैजनाथ, ता. 15 जुलै अंबाजोगाई, ता. 16 जुलै बोरी सावरगाव, ता. 17 जुलै वडगाव (रामा), ता. 18 जुलै मसा, ता. 19 जुलै दगड धानोरा, ता. 20 जुलै खांडवी, ता. 21 जुलै चिंचगाव (टेकडी), ता. 22 जुलै लहुळ, ता. 23 जुलै आष्टी, ता. 24 ते ता.29 जुलै पंढरपूर येथे मुक्काम राहणार आहे.
Source link
नर्सीमध्ये संत नामदेव महाराज पायी पालखी सोहळ्याचे रविवारी प्रस्थान:हिंगोलीत सोमवारी रिंगण सोहळा रंगणार, पालखी सोहळ्याचे 31 वे वर्ष